Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » भारताची घटना किंवा आरक्षण संपलं तर बहुजनांचा आधारच संपेल-भाजप खासदार सावित्रीबाई फुले

भारताची घटना किंवा आरक्षण संपलं तर बहुजनांचा आधारच संपेल-भाजप खासदार सावित्रीबाई फुले

कधी समीक्षा करण्यासाठी तर कधी आरक्षण संपवण्यासाठी.जर भारताची घटना किंवा आरक्षण संपलं तर बहुजनांचा आधारच संपेल. जर आज बहुजन समजाचे लोक पोलीस किंवा अगदी पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहत असतील तर ते बाबासाहेबांच्या घटनेमुळे पाहत आहेत,

भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले  यांनी म्हटले.

माझं म्हणणं आहे की भारताची घटना चांगली आहे. त्याला पूर्णपणे लागू केलं पाहिजे. आजपर्यंत अनेक सरकारं आली पण भारताची घटना पूर्णत: लागू झालेली नाही. म्हणूनच मागास जातीच्या अनेक माणसांना झोपडपट्टीमध्ये सक्तीनं राहावं लागतं. आजही त्यांना मैला वाहून नेण्याचं काम नाईलाजास्तव करावं लागतं.

घटना सर्वार्थानं लागू व्हावी यासाठी काम करणं ही खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे. घटना सर्वसमावेशकदृष्ट्या लागू व्हावी यासाठी पंतप्रधान मोदींनी विनंती केली आहे. घटना पूर्णांशाने लागू होण्यासाठी जे करावं लागेल ते मी करेन.

आता ज्या कायद्याची चर्चा आहे तो होण्यापूर्वी अनुसूचित जाती-जमाती आणि आदिवासी महिलांसह गाव पेटवून देण्यात येत असे. सामूहिक बलात्कार आणि शोषण होत असे.

कायदा आता झाला. अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीचं शोषण केलं तर कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली. लोकांना या कायद्याची भीती वाटते.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg