Breaking News
Home » Uncategorized » भारताच्या पी.एम ने भारतीय क्रिकेटर चे चॅलेंज स्वीकारले !

भारताच्या पी.एम ने भारतीय क्रिकेटर चे चॅलेंज स्वीकारले !

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी कालच  स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर करत #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगखाली तंदुरूस्त भारतासाठी मोहिम चालू केली. ही मोहिम चालू ठेवण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेता हृतिक रोशन यांना अशाच प्राकारचा व्हिडीओ काढून तो ट्विट करण्याचे आव्हान दिले.

यानुसार विराटने आपल्या व्यायामाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत पुढील आव्हान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराटची पत्नी अनुष्का शर्मा व भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना दिले आहे. विशेष बाब म्हणजे विराटचे हे आव्हान स्विकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही आपला व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर करण्याचे कबूल केले आहे.

मोदींनी ‘विराट मी तुझं आव्हान स्विकारलं असून, लवकरच याबाबतचा व्हिडीओ मी शेअर करेन’ असे ट्विट करून हे आव्हान स्विकारल्याची माहिती ट्विटरवरून दिली.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »