Breaking News
Home » बातम्या » खेळ » भारताविरुद्ध वन-डे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

भारताविरुद्ध वन-डे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

घरच्या मैदानावर खेळताना भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने वन-डे मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. पहिल्या ३ वन-डे सामन्यांसाठी आज ‘क्रिकेट साऊथ आफ्रिका’ने संघाची घोषणा केली. पहिल्या ३ सामन्यांसाठी आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व फाफ डु प्लेसीसकडे सोपवण्यात आलेलं असून, कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या लुंगी निगडीचाही संघात समावेश करण्यात आलेला आहे.
लुंगी निगडी व्यतिरीक्त २७ वर्षीय खायलेह झोंडो या खेळाडूलाही आफ्रिकेच्या संघात जागा मिळाली आहे. आगामी २०१९ विश्वचषकासाठी या मालिकेतून दक्षिण आफ्रिकेचा संघ संघ बांधणी करणार असल्याचं क्रिकेट साऊथ आफ्रिका बोर्डाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.
पहिल्या ३ वन-डे सामन्यांसाठी असा असेल दक्षिण आफ्रिकेचा संघ –
फाफ डु प्लेसीस (कर्णधार), हाशिम आमला, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एबी डिव्हीलियर्स, जीन पॉल ड्युमिनी, इमरान ताहीर, एडन मार्क्रम, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्कल, ख्रिस मॉरिस, लुंगी निगडी, अँडले फेलुक्वायो, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, खायलेह झोंडो

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »