Breaking News
Home » Breaking News » भुजबळ ट्विटर वर झळकले .

भुजबळ ट्विटर वर झळकले .

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज ट्विटरवर एंट्री करत पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांशी आपण लवकरच संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे.

त्यांच्यावर उद्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी ट्विटरवर एंट्री केली. माझ्या बांधवांनो आणि माता भगिनींनो, माझ्यावर विश्वास व्यक्त करून आपण मला नेहमीच साथ दिली, त्यामुळे मी आपला आभारी आहे, देशाच्या कानाकोप-यातून आपण मला भेटण्यासाठी उत्सुक आहात, याची मला कल्पना आहे. माझ्यावरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला येणार आहे, असे ट्वीट भुजबळ यांनी केले आहे.

आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगून जामिनावर सुटलेले भुजबळ सोशल मीडियात सक्रिय झाले आहेत. तुरुंगात असताना त्यांची प्रकृती बरीच खालावली होती. त्यांच्यावर आजही उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांना पूर्वीसारखी धावपळ न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे राजकारणात प्रत्यक्ष सक्रिय होण्यास त्यांना वेळ लागणार आहे. असे असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद सुरू केला आहे.

@ChhaganCBhujbal या नावाने भुजबळांचे ट्विटर हँडल आहे. ट्विटरवर त्यांनी आतापर्यंत कुणालाही फॉलो केलेले नाही. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला कठीण काळात साथ देणा-यांचे आभार मानले आहेत.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »