Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचे प्रयंत्न .

मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचे प्रयंत्न .

धुळे महापालिकेत १९८९ साली झालेल्या मागासवर्गीयांच्या भरतीची सीआयडी चौकशी व्हावी, या मागणीसाठी बबन यशवंत झोटे या व्यक्तीने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशाची झोटे यांना कल्पना देण्यात आली होती. तसेच त्यांच्या निवेदनातील मजकूर दिशाभूल करणारा आहे, असा खुलासा राज्य सरकारने केला आहे. 

धुळे पालिकेत मागासवर्गीयांच्या सरळसेवा भरतीत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप झोटे यांनी केला होता. ३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन महिनाभरात सीआयडीमार्फत चौकशी न झाल्यास आत्महत्येचा इशारा दिला होता.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg