Breaking News
Home » लोक सहभाग » लोक मत » मत विभाजनाचे आव्हान पेलणार कसे!

मत विभाजनाचे आव्हान पेलणार कसे!

सध्याच्या स्थितीला महाराष्ट्राच्या राजकारणात जी घालमेल सुरू आहे , ती कधी नवे ते आज SC च्या व्होटिंग ला ज्यास्त महत्व दिल्या जात आहे , आणि ते पण तेवढच सत्य आहे की SC व्होटरवर्ती महाराष्ट्राच्या राजकारनाच गणित अवलंबून आहे .…
परंतु SC व्होटरवर्ती दावा करणारे सध्या तरी महाराष्ट्रात प्रभळ दोन पक्ष दिसत आहेत, एक बसपा आणि दुसरा भारिप आणि परंपरागत काँग्रेस आणि राष्ट्रवादी …
महत्वाचा मुद्दा हा आहे की SC च्या व्होटिंगला हे दोन्हीही पक्ष कश्याप्रकारे एकसंघरित्या ठेवतात,
आणि जर काय हे दोन्हीही पक्ष 2019 निवडणुकीत एकत्रित येत नसतील आणि स्वतःच्या पक्ष्याच्या ओव्हरकॉन्फिडन्स मध्ये राहत असतील, तर SC व्होटिंगच पोलराझेसन होन्याला कुणीही थांबवू शकणार नाही ,
आणि भाजपाला तेच अपेक्षित आहे.
आणि हे दोन आंबेडकरवादी पक्ष एकत्रित आले नाही तर महाराष्ट्रात दोन बाबी घडू शकतात.
एक तर खूप मोठ्या प्रमाणात हे व्होटर भाजपला हरवायच आहे म्हणून आणि स्ट्रॉंग ऑप्शन आहे म्हणून नेहमी पेक्ष्या जास्त प्रमाणात कॉंग्रेस राष्ट्रवादी कडे ट्रान्सफर होतील.
अथवा तीन भागात विभागल्या जातील एक बसपा ,दुसरा भारिप आणि नेहमीप्रमाणे काँग्रेस व राष्ट्रवादी..
याचा अर्थ असा की सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपचा मार्ग मोकळा.
जर भाजप ला थांबवायचं असेल तर तार्किकदृष्टया तरी SC च्या व्होटिंग ला पोलराईझ होण्यापासून थांबविणे हे आंबेडकरी पक्षातील नेत्याचीच नाही तर सामान्य कार्येकरत्याचीही तेवढीच जबाबदारी आहे आणि काळाची गरज आहे .
जर काय बसपा आणि भारिप एकसंघ येत असतील तर
काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला नमतं घेऊन गटबंधन करायला भाग पाडू शकतात…
दुसरी महत्त्वाची बाब ही की बसपा आणि भारिप हे दोन्हीही पक्ष विदर्भात प्रभावशाली आहेत ,
पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आणि त्यामुळे मराठवाडा ,पश्चिप महाराष्ट्र, खानदेश,कोकण या भागातील SC व्होटर हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी चा परंपरागत व्होटर आहे असं समजल्या जाते ,
परंतु प्रकाश आंबेडकरांनी आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात राजकीय अतिक्रमण केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपला परंपरागत व्होटर आपल्यापासून दूर जात आहे याची भीती निर्माण झाली आहे.
आणि खऱ्या अर्थाने शरद पवाराणा जिव्हारी लागण्याच मुख्य कारण हेच आहे .
मायावतीने महाराष्ट्रातील दलितांचे नेतृत्व करावे अस स्टेटमेंट करण्यामागचा हेतू हाच आहे की शरद पवाराणा हे माहीत आहे की महाराष्ट्रात मायावतींना जर आपण प्रमोटही केलं तरी पूर्व विदर्भ सोडून मायावती कुठेही प्रभाव निर्माण करू शकणार नाही त्यामुळे आपल्या परंपरागत क्षेत्रात प्रकाश आंबेडकरांचं झालेला राजकीय अतिक्रमण थांबवू शकु आणि विदर्भ सोडून इतर विभागांतील आपली परंपरागत SC व्होटिंग जैसेथे ठेऊ शकतो .
त्यामुळे शरद पवारांचा हा उठाठेव आहे …
तसही गठबंधनाचा प्रभाव तेव्हाच निर्माण होतो किव्हा यशस्वी होतो.
जेव्हा दोन्हीही पक्ष एखाद्या भागात समान प्रभावशाली असतील तरच.
परंतु इथे खूप मोठा विरोधाभास आहे ज्या भागात बसपाचा प्रभाव आहे त्या भागात राष्ट्रवादीचा प्रभाव नाही आणि ज्या भागात राष्ट्रवादीचा प्रभाव आहे त्या भागात बसपा चा प्रभाव नाही.
आणि त्यामुळे अस गठबंदन झालंही तरी तो यशस्वी होणार नाही बसपाच तर काही फायदा होणार नाही परंतु राष्ट्रवादीच पण हानी होणार नाही हे शरद पवाराना चागल्या प्रकारे माहीत आहे.
शरद पवारांनि मायावतीना प्रमोट करण्यामागचा डावपेच हाच आहे की बसपा च्या आडून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील स्वतःची परंपरागत असलेली SC व्होटिंग प्रकाश आंबेडकराकडे जाण्यापासून थांबवायची आहे .

शेवटचा मुद्दा हाच आहे की महाराष्ट्रातील SC व्होटिंग पोलराईझ होण्यापासून वाचविणे आणि त्यासाठी उपाय एकच आहे ते म्हणजे प्रथमता बसपा आणि भारिपने गठबंदन करने आणि छोट्या मोठ्या आंबेडकरवादी पक्ष्यांना सोबत घेऊन चालणे आणि हे करण्यासाठी नेते जर राजी नसतील तर आपल्या आपल्या पक्षातील सामान्य कार्येकरत्याने आपल्या पक्षात दबाव निर्माण करणे गरजेचे आहे ,
अशी संधी पुन्हा येणार नाही आता आंबेडकरवादी कार्येकरत्याने आता स्वतःच्या पक्षातील ताठरपणा बाजूला सारून संधीच सोन करावं .
आणि अस जर होत असेल तर हे आंबेडकरवादी गठबंदन महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला झुकायेला भाग पाडेल.
हे गठबंदन महाराष्ट्रातल्या राजकारनात नक्कीच अस्तित्व निर्माण करेल आणि किंगमेकरच्या पण भूमिकेत येईल …..
तो चलो पहले अपनी ताकत को समेटते है ……

अतुल खोब्रागडे 

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »