Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » ‘मध्यप्रदेशात आक्रमक प्रचार करा’,राजस्थान’

‘मध्यप्रदेशात आक्रमक प्रचार करा’,राजस्थान’

भाजपने ‘संपर्क फॉर समर्थन’च्या अंतर्गत दिग्गजांच्या भेटीगाठी घेऊन लोकसभा निवडणुकींची मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांदरम्यान झालेल्या या ४५ मिनिटाच्या चर्चेत पवार यांनी राहुल यांना मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आक्रमक प्रचार करण्याचा कानमंत्र दिला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राहुल गांधी यांना शरद पवारांना भेटायचं होतं. त्यामुळे पवार दिल्लीत एका दिवसासाठी आले होते. पवार दिल्लीत आल्याचं कळल्यावर राहुल यांनी पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोघांमध्ये बंद दाराआड सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. विरोधी पक्षांची मोट बांधून भाजपविरोधात आगामी डावपेच आखण्यावर या भेटीत प्रामुख्याने जोर देण्यात आल्याचं सांगण्यात येतं. शिवाय या भेटीत पवार यांनी राहुल यांना राजकीय कानमंत्र दिल्याचंही सांगण्यात येतं.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg