Breaking News
Home » Breaking News » मराठा मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम तरुणाने केलं मुंडन

मराठा मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम तरुणाने केलं मुंडन

परभणी : मराठा क्रांती ठोक मोर्चा ला दिवसें दिवस पाठिंबा वाढत असून आज पाथरीतील धरणं आंदोलनात एका मुस्लीम युवकासोबतच शिवसेनेच्या पाथरी पंचायत समिती 24 सदस्यांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला. पाथरी शहरात गेल्या सहा दिवसापासून मराठा क्रांती मोर्चा ला पाठिंबा देत बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला समाजाच्या विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून पाथरीत वकील संघाने पाठिंब्याचे पत्र दिल्यानंतर शेख मोईनोद्दीन या मुस्लीम युवकाने राष्ट्रीय महामार्गावर बसून भाजप सरकारचा निषेध करत मुंडन करून घेतले.

याच वेळी शिवसेनेचे पाथरी पंचायत समितीचे सदस्य यांनी ही भाजपा सरकारचा निषेध करत मुंडन केले. यावेळी अनिल काळे, कृष्णा शिंदे, तुकाराम शिंदे, भागवत कोल्हे, तुकाराम पैळ, विष्णू काळे, संदिप टेंगसे, सोमेश गरड, अमोल टाकळकर यांनी धरणे आंदोलनाच्या तहसील कार्यालयासमोर  स्वत:चे मुंडन करून घेतले.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »