Friday , 16 November 2018
Breaking News
Home » Breaking News » मराठा समाजाच्या राजकीय पक्षाची ऑक्टोबरमध्ये घोषणा -सुरेश पाटील

मराठा समाजाच्या राजकीय पक्षाची ऑक्टोबरमध्ये घोषणा -सुरेश पाटील

कोल्हापूर

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि मनसे या साऱ्याच पक्षांकडून मराठा समाजावर अन्याय झाला आहे. समाजाच्या न्याय हक्कासाठी आता सकल मराठा समाजाचा राजकीय पक्ष स्थापन करण्यात येणार आहे. राज्यभर दौरे, नागरिक व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन ऑक्टोबरमध्ये मराठा समाजाच्या राजकीय पक्षाची घोषणा केली जाईल, अशी माहिती मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी केली.
सर्वच पक्षात नेतृत्व करणारे मराठा असून देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला नाही. यामुळे ‘मराठा समाजाचा राजकीय पक्ष हा ‘आरक्षण, संरक्षण, शिक्षण, उद्योग, रोजगार आणि शेती’ या सहा सूत्रांवर आधारित काम करणार आहे. या पक्षाच्या माध्यमातून मराठा समाजाची व्होट बँक निर्माण करण्यात येणार आह, असं सुरेश पाटील म्हणाले.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg