Wednesday , 15 August 2018
Breaking News
Home » Breaking News » महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद

महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद

पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की

काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी धक्काबुक्की केली. तसेच त्यांना या परिसरातून हाकलून लावण्यात आले. याशिवाय शहरासह जिल्ह्यात आंदोलन पेटल्याने सकाळपासून औरंगाबादेतील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तर आक्रमक झालेले आंदोलक रस्त्यावर असून, शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बाजारपेठा बंद आहेत. औरंगाबाद शहरातील प्रमुख बाजारपेठाही बंदच आहेत

मराठा आरक्षणावरून देवगाव रंगारी येथे सुरू असलेल्या आंदोलनात तहसील प्रशासन दीड तास निवेदन स्वीकारायला आले नाही. म्हणून जयेश द्वारकदास सोनवणे या तीस वर्षीय युवकाने पुलावरून वेळगंगा नदीत उडी मारली. त्याच्या पायाला जबर मार लागला आहे तर जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे या पन्नास वर्षीय व्यक्तीने विषप्राशन केले. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

कायगाव येथे मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी दगडफेक सुरू केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आंदोलकांनी पोलिसांवर प्रतिहल्ला करत अग्निशमन दलाच्या गाड्यांना आग

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी (ता.24) सकाळी अकरा वाजता शिवाजी पुतळा येथून विराट मोर्चाला सुरवात करण्यात आली. यावेळी आमदार, खासदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे पोलिसांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यातील दोन आगारांची बससेवा पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. तर जालना आगाराची बससेवा काही प्रमाणात सुरू असल्याचे विभागीय नियंत्रक यू. बी. वावरे यांनी ‘सकाळी’शी बोलताना सांगितले. तसेच पोलिसांच्या सुचनेनुसार जालना जिल्ह्यातील अंबड, परतूर या दोन आगाराची बससेवा थांबविण्यात आली आहे. तर जालना आगारातून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेस थांबविण्यात आल्या आहेत.

About Admin