Breaking News
Home » मार्गदर्शन » “मागेल त्याला सिंचन विहीर” हे सरकारचे धोरण चुकीचे

“मागेल त्याला सिंचन विहीर” हे सरकारचे धोरण चुकीचे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनांची जाहिरात करून नुसता प्रपोगंडा

साक्री – शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व विशेष घटक योजना या दोन योजना स्वतंत्रपणे न राबवता एकत्रित राबवून नवीन विहीर व जुनी विहीर दुरुस्तीसाठी अनुसूचित जाती, नवबौध्द शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ही योजना Online आहे. http://agriwell.mahaonline.gov.in/ या साईट वर जाऊन शेतकऱ्यास Online फॉर्म भरून संपूर्ण कागदपत्रे Upload करावे लागतात व शेवटी MahaOnline Service Charges 20.00 SGST(State Goods and Service tax 9.00%) 1.80 CGST(Central Goods And Service tax 0.00%) 1.80 असे २३.६० व सायबरवाल्यास १०० ते १५० रु. शेतकऱ्यांकडून वसूल केले जातात. या योजनेसाठी साक्रीतील काही लाभार्थ्यांनी Online Form भरले; परंतु त्यांना श्री. बी. डी. कुंवर (कृषी विभाग पं.स., साक्री) यांनी दिलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र जि.प. व पं.स. अधिनियम १९६१ प्रशासकीय क्षेत्रे ४(१) नुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीचे कायक्षेत्र महानगरपालिकेच्या व नगरपालिकेच्या हद्दी वगळून असल्यामुळे नगर पंचायत व महानगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देता येणार नाही. प्रस्ताव तयार करतांना शेतकरी लाभार्थ्यांना अशी कोणतीही Online किंवा Offline गाईड लाईन नाही, तसेच अधिकारी व कर्मचारी यांनाही या योजनांची अधिक माहिती नसल्याने बऱ्याच दिवस पाठपुरावा केल्यावर जि.प. उस्मानाबाद येथून इमेलद्वारे सदरचे परिपत्रक उपलब्ध करून दिले. तोपर्यंत शेतकऱ्यांचे online फॉर्म भरले गेले आहेत. शेतकऱ्यांचे प्रबोधन योग्यरित्या न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यक्षेत्र महानगरपालिकेच्या व नगरपालिकेच्या हद्दी वगळून असल्यामुळे नगर पंचायत व महानगरपालिका क्षेत्रातील शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. एका बाजूला सरकार म्हणते “मागेल त्याला सिंचन विहीर” हे ब्रीद फ्लॉप ठरत आहे. साक्री तालुका हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका आहे व चालू वर्षी तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांकडून प्रस्ताव ही आले आहेत; परंतु शासनाने फक्त ९ चा लक्षांक दिला आहे सादर लक्षांकात वाढ व्हावी अशीही मागणी होत आहे.

प्रकाश संभाजी वाघ, साक्री M.A. (M.C.J.)
Swabhimani News Channel,

साक्री तालुका रिपोर्टर.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »