Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » माझ्या कुटुंबासोबत कुठलीही अप्रिय घटना घडली तर त्याची जबाबदारी गृहविभागाची-राबडी देवी

माझ्या कुटुंबासोबत कुठलीही अप्रिय घटना घडली तर त्याची जबाबदारी गृहविभागाची-राबडी देवी

बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांची सुरक्षा बिहार सरकारकडून काढून घेण्यात आली आहे. मात्र, यामुळे राबडी देवी चांगल्याच भडकल्या असून सरकारने माझ्या व माझ्या कुटुंबाविरोधात घातपाताचा कट रचल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. सुरक्षा रक्षक हटवल्यामुळे जर आम्हाला काही झाले तर त्याला राज्याचा गृहविभाग जबाबदार असेल असे त्यांनी म्हटले आहे.

बिहारची राजधानी असलेल्या पाटणामध्ये राबडी देवी यांचे १० सर्कुलर रोड येथे घर आहे. या घराच्या सुरक्षेसाठी येथे बीएमपीकडून ३२ पोलिस तैनात करण्यात आले होते. मात्र, आता नवा आदेश काढून या सर्व ३२ सुरक्षा रक्षकांना हटवण्यात आले आहे. ही सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्यानंतर राजदच्या सर्वच नेत्यांनी राज्य सरकारवर हल्लबोल सुरु केला आहे.

यापूर्वी १० सर्कुलर रोड येथील आपल्या निवासस्थानावरुन सुरक्षा रक्षकांना हटवण्यात आल्याने नाराज असलेले माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि माजी मंत्री तेजप्रताप यादव यांनी आपल्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक ठेवण्यालाही नकार दिला होता. तेजस्वी यादव यांनी सांगितले की, माझी आई राबडी देवी यांना माजी मुख्यमंत्री या नात्याने ही सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. त्याचबरोबर माझा भाऊ आमदार असल्याने त्यांना ही सुरक्षा मिळाली होती. मात्र, आम्ही ही सुरक्षा आता नितीशकुमार सरकारकडे पुन्हा सोपवत आहेत. दरम्यान, बिहारच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, सुरक्षा परत घेण्याचा निर्णय़ हा विेशेष समितीने घेतला आहे. ही समिती व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेची वारंवार पाहणी करीत असते.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg