Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » मी निर्दोष : राहुल गांधी

मी निर्दोष : राहुल गांधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानीच्या एका खटल्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मात्र राहुल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचं न्यायालयात स्पष्ट केलं आहे.

६ मार्च २०१४ रोजी राहुल गांधी यांनी एका निवडणुक प्रचार सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महात्मा गांधी यांची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे राजेश कुंटे या स्थानिक कार्यकर्त्याने राहुल यांच्याविरोधात भिवंडी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. कुंटे यांनी भादंवि कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत तक्रार नोंदविली होती. त्यानंतर २ मे रोजी न्यायालयाने राहुल यांना १२ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, या प्रकरणावर येत्या १० ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार आहे. यावेळी राहुल यांच्यासोबत काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत उपस्थित होते.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg