Wednesday , 15 August 2018
Breaking News
Home » बातम्या » मी शिष्यवृत्तीचा अर्ज मागे घेत आहे

मी शिष्यवृत्तीचा अर्ज मागे घेत आहे

मुंबई – सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंची कन्या श्रुती बडोलेने स्वत:हून परदेश शिष्यवृत्ती सोडण्याची तयारी दर्शवली आहे. शिष्यवृत्ती निवडीवरुन झालेल्या वादानंतर श्रुतीनं हा निर्णय घेतला आहे.
यावेळी श्रुतीनं आपल्याला गुणवत्तेनुसार प्रवेश आणि शिष्य़वृत्ती मिळाली असल्याचा दावा केला आहे. तसंच, माझ्यात गुणवत्ता आहे पण माझे बाबा मंत्री आहेत, त्यात माझा काय दोष? असा सवालही श्रुतीनं विचारला आहे. मात्र, कुणाचाही हक्क आपण डावलला नसून, जर यामुळे कुण्या दुसऱ्याची गुणवत्ता झाकोळली जाणार असेल तर आपण शिष्यवृत्ती नाकारत असल्याचंही श्रुतीनं पत्रातून स्पष्ट केलं आहे.
माझ्यात गुणवत्ता आहे आणि माझे वडील मंत्री आहेत यात माझा दोष काय? – श्रुती राजकुमार बडोले
मी श्रुती राजकुमार बडोले आय आय टी मद्रास मधून मी शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी माझे वडील मंत्री नव्हते. युकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स मध्ये मी माझं एम एस्सी पूर्ण केलं. याठिकाणी मी गुणवत्तेनुसार माझा प्रवेश आणि शिक्षण झालं. विद्यापीठाने गुणवत्तेमुळे मला शिष्यवृत्ती दिली (सरकारी नव्हे) अवकाश संशोधनात काम करायचं हे माझं स्वप्न होत त्यानुसार मी एक एक पायरी चढत गेले तीही गुणवत्तेनुसारच, त्यावेळी माझे वडील मंत्री नव्हते.
अस्ट्रो फिजिक्स या विषयात जगातल्या पहिल्या 26व्या विद्यापीठात माझी निवड झाली. ती गुणवत्तेनुसार. या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा हे मी ठरवलंय. मी कर्ज काढुन शिक्षण घेणार नाही हे मी बाबांना आधीच सांगितलं. या पूर्वी भावाच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्जाचे हप्त्ते अजूनही सुरू आहेत.
मला यापूर्वी गुणवत्ते नुसार विदेशातल्या विद्यापीठांनी शिष्यवृत्ती दिलीय. पण पीएचडीसाठी शिष्यवृत्तीची या विद्यपीठात सवलत नाहीय. गुणवत्तेनुसार माझी निवड झाली आहे तर मी याच विद्यापीठात प्रवेश घेणार म्हणून, मी राज्य सरकारकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. (जगातल्या पहिल्या शंभर विद्यापीठ मध्ये प्रवेश मिळत असेल तर त्या विद्यार्थ्याला कुठलाही आर्थिक निकषांची अट नाही हा जीआर आहे) तरी मंत्री मुलगी आहे यावर वाद होतील हे आधी वडिलांनी निदर्शनास आणून दिल. त्यामुळे वडिलांनी या निवड प्रक्रियेपासून स्वतःला बाजूला केलं.
पीएचडी इन सायन्स यासाठी राज्य सरकार च्या शिष्यवृत्ती करीत तीन जागा आहेत. या तीन जगासाठी केवळ दोन अर्ज आलेत त्यात एक जागा अजूनही रिक्त आहे. या जागेसाठी अजूनही अर्ज आलेला नाही. तर मी कुणाला डावलून शिष्यवृत्ती मिळवली का? जगातल्या पहिल्या 100 विद्यापीठात प्रवेश घेताना आर्थीक निकष लागू नाहीत हा माझ्या शिक्षणापूर्वीच नियम आहे. यात मी पात्र असेल तर यात माझा दोष आहे का? माझं या पूर्वीच शिक्षण गुणवत्तेनुसार झालं आहे. आता वडिलांच्या मंत्री पदा मुळे माझी गुणवत्ता कमी झाली का? कुणाचाही हक्क कधी डावलला नाही. आणि कधी डावलणार नाही. वडील मंत्री आहेत म्हणून शिष्यवृत्तीवर वाद होत असेल. आणि यामुळे माझी गुणवत्ता झाकोळली जाणार असेल तर मी शिष्यवृत्ती नाकारत आहे पण मी शिकणार अवकाश संशोधनात जाणारच. सावित्रीबाई आणि बाबासाहेबांचं शिक्षणासाठीच स्वप्न साकार करण्यासाठी.

आपली

श्रुती राजकुमार बडोले

About Admin