Breaking News
Home » Breaking News » मुद्रा योजनेंतर्गत उत्पन्न झालेल्या नोकऱ्यांचा अहवाल मोदी सरकारनं सार्वजनिक करण्याआधीच दडवला

मुद्रा योजनेंतर्गत उत्पन्न झालेल्या नोकऱ्यांचा अहवाल मोदी सरकारनं सार्वजनिक करण्याआधीच दडवला

नवी दिल्ली-नोकऱ्या उत्पन्न होण्यासंदर्भातील तिसरा अहवाल मोदी सरकारनं सार्वजनिक करण्याआधीच दडवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुद्रा योजनेंतर्गत उत्पन्न झालेल्या नोकऱ्यांच्या संख्यांशी संबंधित आकडे तज्ज्ञांच्या कमिटीला या अहवालासाठी वापरण्यात आलेल्या पद्धतीमध्ये अनियमितता आढळली आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (NSSO)चा अहवाल फेटाळल्यानंतर एनडीए सरकारनं लेबर ब्युरोच्या सर्व्हेच्या निष्कर्षांचा वापर करून नवा अहवाल बनवण्याचं ठरवलं होतं.गेल्या शुक्रवारी झालेल्या एका बैठकीत लेबर ब्युरोनं अहवालात काही त्रुटी आढळल्या होत्या, त्या दुरुस्त करण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यासाठी लेबर ब्युरोनं दोन महिन्यांचा अवधी मागितला आहे. केंद्रीय श्रम मंत्र्यांनी या अहवालाला अद्याप मंजुरी दिलेली नाही. आचारसंहिता लागू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आता हा अहवाल निवडणुकांनंतर सार्वजनिक करण्यात येणार आहे. एनडीए सरकारनं आतापर्यंत एनएसएसओच्या लेबर ब्युरोचा नोकरी आणि बेरोजगारीसंदर्भातील वार्षिक अहवाल सार्वजनिक केलेला नाही. या दोन्ही रिपोर्टमध्ये एनडीए सरकारमध्ये बेरोजगारी वाढल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »