Breaking News
Home » News » म्हाडावासीयांना फसवण्यात आले !

म्हाडावासीयांना फसवण्यात आले !

सावरकरनगरमधील म्हाडावासीयांची फसवणूक करत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.क्लस्टर योजनेच्या नावाखाली शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक लोकमान्यनगर गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांनी ज्ञानोदय विद्यामंदिरात स्थानिकांची एक बैठक बोलावली होती.त्यात म्हाडावासीयांना योजनेसाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले.

पालिका अधिकाऱ्याच्या उपस्थितीत ही धूळफेक सुरू होती, असा चव्हाण यांचा दावा आहे. सावरकरनगर म्हाडा ही एलआयजीमधील वसाहत असून, तेथील भूखंड हे लॉटरी पद्धतीने वितरित केलेले आहेत. अद्याप या चाळीतील संस्थांचे अभिहस्तांतरण झालेले नाही. तसेच या वसाहतीचा लेआऊट म्हाडाने तयार करून ठाणे महापालिकेच्या मंजूरीकरिता सादर केलेला नाही. त्यामुळे इथे ही योजना राबवताच येत नसल्याचे चव्हाण यांचे म्हणणे आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतांच्या राजकारणासाठी ही दिशाभूल सुरू असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. या आमिषांना लोकांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »