Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » यापुढे जगातील कोणत्याही देशाच्या निवडणुकात आम्ही सतर्क राहू – झुकेरबर्ग

यापुढे जगातील कोणत्याही देशाच्या निवडणुकात आम्ही सतर्क राहू – झुकेरबर्ग

अमेरिकी संसदेच्या समितीसमोर मार्क झुकरबर्गची  चौकशी झाली त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलं.सोशल नेटवर्कचं शोषण करू पाहणाऱ्या रशियन ऑपरेटर्सशी फेसबुकचं नियमितणे युद्ध सुरू आहे.अमेरिकी निवडणुकांमध्ये परकीय शक्तींचा हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेण्यासाठी फेसबुक काय करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावेळी 2018 मध्ये फेसबुक समोरची ही सर्वांत मोठी प्राथिकता असल्याचं झुकरबर्ग यांनी सांगितलं.

यावेळी मार्क झुकरबर्ग यांना अमेरिकी खासदार मिसेस फिनस्टिन यांनी भारतासंदर्भात देखील प्रश्न विचारला.”यंदाचं वर्ष फक्त अमेरिकेसाठी नाहीच तर जगभरात निवडणुकांसाठी महत्त्वाचं आहे. भारत, ब्राझिल, मॅक्सिको, पाकिस्तान आणि हंगेरी या सर्व देशांसाठी हे वर्ष निवडणुकांचं आहे. या देशांमधल्या निवडणुकांच महत्त्व कायम रहावं, तसंच त्यात कुठलीही बाधा येणार नाही यासाठी संपूर्ण काळजी घेऊ,” असं स्पष्टीकरण झुकरबर्ग यांनी दिलं आहे

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg