Breaking News
Home » News » येत्या २ दिवसात मान्सून आनंद घेणार महाराष्ट्र.

येत्या २ दिवसात मान्सून आनंद घेणार महाराष्ट्र.

मोसमी पाऊस पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र व गोव्यात पोहोचेल असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने या आठवडय़ात जोरदार व दमदार पाऊस राहील असा अंदाज दिला आहे. ६ ते १० जूनदरम्यान मुंबईत खूपच जास्त पावसाची शक्यता असून लोकांनी घरात राहणे पसंत करावे असा इशारा  देण्यात आला आहे.

स्कायमेटने म्हटले आहे की, मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर ८ जून ते १० जून दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे.

सरकारी संस्थेने म्हटले आहे की, केरळ, किनारी कर्नाटक, कोकण, गोवा या भागांत  येत्या सात जून रोजी पाऊस वाढण्याची शक्यता आहे. या भागात १० जूनपासून पूर येण्याची शक्यता आहे. मोसमी पाऊस २९ मे रोजी केरळात आला असून तो अपेक्षेपेक्षा लवकर आला. तामिळनाडू तसेच बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य व ईशान्य  दिशेला आगेकूच करीत आहे. तो ईशान्येकडील राज्यात आता मार्गक्रमण करील. दक्षिण द्वीपकल्प, बंगालचा उपसागर, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुराचा उर्वरित भाग, मेघालयाचा काही भाग या भागांत मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी २-३ दिवसांत अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »