Breaking News
Home » Breaking News » रत्नागिरीत ८ मार्च ला भारिप चा मेळावा
रत्नागिरीत ८ मार्च ला भारिप चा मेळावा

रत्नागिरीत ८ मार्च ला भारिप चा मेळावा

भारताची शासन यंत्रणा राज्यघटनेनुसार सुरू होवून 69 वर्ष झाली .घटनेस आणि घटनाकारांना अभिप्रेत असलेली समाज आणि राजकीय व्यवसथा निर्माण करण्यात प्रस्थापित राजकीय नेतृत्वास अपयश आले असून आजही कुणबी ,तेली ,माली ,धनगर ,बनगर ,वंजारी ,गारुडी ,कैकाडी ,कोळी ,भंडारी ,मातंग ,चर्मकार ,बौद्ध ,मुस्लिम समाज हा इथल्या व्यवस्थे बाहेरच्या परिघावरच आहे .स्वातंत्र्याच्या 70 वर्षात विकास झाला परंतु तो ठराविक जाती समूह आणि ठराविक राजकीय घराण्याचा .आजही हा उपेक्षित वर्ग शिक्षण ,रोजगार ,योग्य संधी पासून वंचित आहे .त्याला राजकीय निवडणुकीत वापरून घेऊन फोडणीतील कडीपत्या सारखा काढून फेकला जात असून ,कोकणात बहुसंख्य असलेला कुणबी समाज .या समाज्याला राजकीय अस्पृश्य ठरवून त्याच्या मतांच्या जोरावर अल्पसंख्य असलेल्या प्रस्थापित जातीचा लोकप्रतिनिधी बसवून त्याचे शोषण सुरू आहे .या सर्व समाज्यात शिक्षणाची आता कुठे सुरुवात झाली असताना ,आणि 1991 मध्ये मंडल आयोगाची माननीय प्रकाश आंबेडकरांनी मागणी लावून धरल्यानंतर प्रधानमंत्री व्ही .पी .सिंग यांनी अंमलबजावणी सुरू झाल्यावर नोकरीत उपलब्ध झालेल्या संधीस अडथळा निर्माण करण्यासाठी शिक्षणाचे खाजगीकरण करून शिक्षण महाग केलेच तसेच सरकारी कंपन्या ठराविक भांडवलदार यांच्या घश्यात घालून नोकरीत मिळालेले आरक्षणास सुद्धा अटकी लावली आहे .ओबीसी वर्गात असलेल्या 52 टक्के समाज्याच्या आरक्षणास संपविण्याचे कुटील राजकारण सुरू झाले असून शिवसेना -भाजप सरकारला भारतीय संविधान नष्ट करून विषमतावादी मनुस्मृतीचे ब्राम्हणी व्यवस्थेचे राज्य निर्माण करायचे आहे . ज्यामध्ये इथल्या ओबीसी ,आदिवासी ,अनुसूचित जाती -जमाती ,अस्पृश्य आणि अल्पसंख्याक ,मुस्लिम समाज्याला संविधानाने धार्मिक ,सामाजिक आणि राजकीय दिलेले अधिकार नाकारून ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम करायचे या सरकारचे प्रयत्न सुरू असून भारतीय संविधानाने दिलेले अधिकार,स्वातंत्र्य ,समता ,बंधुता ,न्याय जर टिकवायचा असेल ,संविधान वाचवायचे असेल तर इथल्या ओबीसी ,मुस्लिम ,आदिवासी ,अस्पृश्य या समाज्याने हातात हात घालून इथल्या राजकीय व्यवस्थे विरोधात उभे राहणे गरजेचे आहे .आणि ही लढाई एकसंघतेने लढणे आणि जिंकण्यासाठी रस्त्यावर ,मैदानात उतरावे लागेल ,उबदार घरात बसून लढाई न करता आपल्यास काहीच मिळणार नाही ,हे सरकार काहीही देणार नाही .गेल्या 70 वर्षात कॉग्रेस ,भाजप शिवसेना यांनी या वंचित समूहाच्या तोंडाला पानेच पुसली असून ही कोंडी फोडण्यासाठी आणि वंचित बहुजनांना त्याचे हक्क ,अधिकार मिळवून देण्यासाठी घटनाकारा डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक आणि रक्ताचे वारस श्रध्येय प्रकाश आंबेडकर हे गेली चाळीस वर्षे सातत्यपूर्ण संघर्ष करीत आहेत .आजची राजकीय परिस्थिती बघता या जुलमी सरकारचा सामना करण्यासाठी ,वंचित बहुजन आघाडीचा सक्षम राजकीय भूमिका असलेला परिवर्तनवादी विचारमचं उपलब्ध असून सर्व शोषिक ,पीडित समूह आज बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठी खंबीरपणे उभा राहत आहे .जाहीर सभांना मिळणारा उत्स्फूर्त सहभाग ,लाखोंचा जनसमुदाय याची ग्वाही देत असून परिवर्तन हे अटळ आहे .या परिवर्तनाच्या चळवळीत ,आपल्या न्याय हक्कांसाठी ,इथल्या कोळी ,भंडारी ,कुणबी यांच्या जगण्याची साधने हिरावून घेणाऱ्यांना पायबंद करण्यासाठी आणि उद्योगपतींचे रामदासी गोडवे गाणाऱ्या ,कोकणातील दादागिरी ,गुंडगिरी ,भ्रष्टाचार ,संपुष्टात आणण्यासाठी आणि कोकणातील सामंतशाहिस मूठ माती देण्यासाठी , आपल्या भावी पिढ्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी माननीय प्रकाश आंबेडकरांचे हात मजबूत करून ही लढाई जिंकू या .
वंचित बहुजन आघाडीच्या रत्नागिरी येथे होत असलेल्या दिनांक :08 मार्च 2019 रोजीच्या जाहीर सभेस लाखोंच्या संख्येने उपस्थित राहवून आपल्या एकतेचे दर्शन घडवा ही विनंती .

चलो रत्नागिरी …..चलो रत्नागिरी ….

कश्यासाठी वंचितांच्या हक्कांसाठी …
समतेच्या लढ्यासाठी ……..

आव्हान कर्ता _
जय कदम
भारिप रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »