Breaking News
Home » Breaking News » शशी थरूर यांचा कसूर, सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी समन्स

शशी थरूर यांचा कसूर, सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी समन्स

काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या अडचणीत वाढ झाली असून पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने त्यांना आरोपी मानले आहे. त्यामुळे थरुर यांना ७ जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश मंगळवारी कोर्टाने दिले. आरोपपत्रानुसार, थरुर यांनीच सुनंदा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आरोप आहे.

कोर्टाने समन्स बजावल्याने शरुर यांच्यावर आता खटला सुरु होणार असून ७ जुलैपूर्वी त्यांना कोर्टात हजर रहावे लागणार आहे. मंगळवारी दिल्ली पोलिसांनी सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी ३००० पानांचे आरोपपत्र कोर्टात सादर केले. या आधारे कोर्टाने थरुर यांना आरोपी मानले आहे. या प्रकरणी अनेकदा पोलिसांनी थरुर यांची चौकशी केली आहे. कोर्टाने असे देखील म्हटले आहे की, सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी थरुर यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत.

दिल्ली पोलिसांनी थरुर यांच्याविरोधात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात कलम ३०६ आणि ४९८ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्ली पोलिसांनी कलम ३०६नुसार, थरुर यांच्यावर सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर घरगुती हिंसाचार प्रकरणी कलम ४९८ ए देखील लावण्यात आले आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »