Monday , 15 October 2018
Breaking News
Home » व्यक्तिमत्व » राजकारणी » शेतकऱ्यांचे कैवारी आप्पासाहेब नारायण नागू पाटील!

शेतकऱ्यांचे कैवारी आप्पासाहेब नारायण नागू पाटील!

आज 29 ऑगस्ट रोजी आगरी समाजरत्न माननीय आप्पासाहेब नारायण नागू पाटील ह्यांची जयंती. कुळ कायद्याचे जनक व खोतांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे नारायण नागू पाटील ह्यांच्या पवित्र स्मृतीस शिवक्रांती मावळा रायगड, प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना, काका एंटरप्राइजेस, साई प्रेरणा सहकारी संस्था व समस्त भूमिपुत्रांकडून अभिवादन!!!
खोत व सावकारांकडून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नारायण नागू पाटील या ध्येयवेड्या प्राथमिक शिक्षकाने शेतकऱ्यांचा लढा उभा केला. १९३३ चरी येथे शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन बेमुदत संप सुरु केला. शेती करणे कुळांनी थांबविले. तब्बल सहा वर्ष शेती बंद. जगाच्या इतिहासात सहा वर्षे सुरु असलेला हा एकमेव संप. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बंगालमधील ‘निळी’च्या बागेतील व गुजरातमधील बोर्डोली सत्याग्रहही यापेक्षा लहान होता. या आंदोलनाने सरकारला कुळ कायदा बनविण्यास भाग पाडले. याच आंदोलनात नारायण पाटील यांनी शेतकऱ्यांचा स्वतंत्र पक्ष असावा अशी भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘कृषिवल’ वृत्तपत्र सुरु केले. आगरी-कोळी बांधवांच्या लढाऊ बाण्याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे ना. ना. पाटील.

“शेतकऱ्यांच्या लढाऊ नेतृत्वाचा जीवनपट पुढीलप्रमाणे”

 • जन्म – २९ ऑगस्ट, १८९२

 • प्रवास – रोह्यातील प्राथमिक शिक्षक ते आगरी-कोळी समाजाचे पहिले आमदार.

 • १९१७ – अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावात भरलेल्या पहिल्या आगरी समाज परिषदेत सहभाग

 • १९२७ – कोकण प्रांत शेतकरी संघात सहभाग

 • २५ डिसेंबर १९३० – पेण मध्ये भरलेल्या पहिल्या कुलाबा जिल्हा शेतकरी परिषदेचे आनंदराव चित्रे यांच्यासोबत नेतृत्व

 • २४ जानेवारी १९३१ – पोलादपूरला शेतकरी सभा

 • ७ फेब्रुवारी १९३१ – माणगावला शेतकरी परिषद – खोती पद्धत बंद करण्याची जोरदार मागणी

 • १७ मे १९३१ – खेडमध्ये भरलेल्या शेतकरी परिषदेचे अध्यक्ष

 • २२ मे १९३१ – तळा येथे आनंद चित्रे यांच्या अध्यक्षतेखाली सभा. सभा होऊ नये यासाठी सावकारांनी जंग जंग पछाडले. पण सभा यशस्वी. सभेनंतर चित्रे व नारायण नागू पाटील यांच्याविरोधात खोट्या तक्रारी.

 • ३१ डिसेंबर १९३१ – रोहा येथे शेतकरी परिषद – बाळासाहेब गंगाधर खेर यांना अध्यक्ष केले. खेर परिषदेला येऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले पण ते आले व परिषद यशस्वी झाली.

 • १ जानेवारी १९३२ ते १९३३ जवळपास एक वर्ष नारायण पाटील यांच्यावर भाषण बंदी.

 • ऑक्टोबर १९३३ – सरकारने त्यांच्यावरील भाषण बंदी उठविली.

 • २७ ऑक्टोबर १९३३ – चरी या छोट्याशा गावात २५ गावांतील शेतकऱ्यांची सभा बोलावली.

 • चरीच्या सभेत शेतकऱ्यांना संपावर जाण्याचे आवाहन व ऐतिहासिक आंदोलनाला सुरुवात.

 • १९३४ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चरी येथे येऊन आंदोलकांना मार्गदर्शन केले.

 • २५ ऑगस्ट १९३५ – जिल्हाधिकाऱ्यांनी चरी येथे जाऊन ना. ना. पाटील व सहकाऱ्यांची भेट घेतली.

 • ७ जून १९३७ – शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘कृषिवल’ वृत्तपत्र सुरु

 • १९३९ – जगातील सर्वात प्रदीर्घ काळ सुरु असलेला शेतकरी संप मागे

 • १९३९ – तत्कालीन इंग्रज सरकारने कुळ कायदा मंजूर केला.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg