Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » संघाचे समर्थक असल्याचा आरोप सराटेंवर औरंगाबादमध्ये क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची शाईफेक

संघाचे समर्थक असल्याचा आरोप सराटेंवर औरंगाबादमध्ये क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची शाईफेक

औरंगाबाद

मराठा समाजाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेण्याचे काम सुरु आहे. यासाठी राज्यातील मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. एम. जी. गायकवाड हे सध्या औरंगाबादमध्ये आहेत. शुक्रवारी सुभेदारी सभागृहात ते समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत होते. यादरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचे काही कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना गाठले आणि त्यांच्यावर शाई फेकली. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना रोखले. सराटे हे संघाचे समर्थक असून ते मराठा आरक्षणाविरोधात काम करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी सराटे यांना शिवीगाळही केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शाई फेकली. सराटे यांच्या संस्थेला सर्वेक्षणाचे काम दिल्याने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते नाराज होते.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg