Breaking News
Home » Breaking News » संघ – भाजपने समाजात निर्माण केलेली दरी एल्गार परिषदेच्या माध्यमातून सावरते – प्रकाश आंबेडकर

संघ – भाजपने समाजात निर्माण केलेली दरी एल्गार परिषदेच्या माध्यमातून सावरते – प्रकाश आंबेडकर

संघ आणि भाजपने समाजात निर्माण केलेली दरी एल्गार परिषदेच्या माध्यमातून मिटवत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला आहे. नोटबंदी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात येत्या काही दिवसांत जेलभरो आंदोलन करण्‍यात येणार असल्याचाही इशारा यावेळी आंबेडकरांनी दिला आहे.

राज्यातील पोलिस खाते सध्या भाजपचे विंग म्हणून काम करत आहे, अशा खोचक शब्दात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली आहे. मंगळवारी मुंबईत प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पोलिस खात्याने पुराव्याची कागदपत्रे भाजप नेत्यासमोर सादर करण्‍यापेक्षा कोर्टासमोर सादर करावे. मात्र, पोलिस खाते भाजपचे विंग म्हणून का काम करतेय, असा सवाल आंबेडकरांनी यावेळी उपस्थित केला. सादर केलेली कागदपत्रे खरी आहे की खोटी हे कोर्ट सिद्ध करेल, त्यामुळे पोलिस खाते महत्त्वाचे खाते आहे हे मानायला तयार नसल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले.

संघ आणि भाजपने समाजात निर्माण केलेली दरी एल्गार परिषदेच्या माध्यमातून मिटवत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला आहे. नोटबंदी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात येत्या काही दिवसांत जेलभरो आंदोलन करण्‍यात येणार असल्याचाही इशारा यावेळी आंबेडकरांनी दिला आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »