Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » सचिन वाघ आत्महत्या प्रकरण..विद्यार्थ्यांचा मोर्चा, एमआयटीवर कारवाईची मागणी

सचिन वाघ आत्महत्या प्रकरण..विद्यार्थ्यांचा मोर्चा, एमआयटीवर कारवाईची मागणी

औरंगाबाद- कॉपी करताना पडकड्यानंतर एमआयटी महाविद्यालयाच्या नर्सिंगचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी सचिन वाघ (वय-19) याने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी महाविद्यालयातील इतर विद्यार्थी आक्रमक झाले असून त्यांनी बुधवारी दुपारी सातारा पोलिस स्टेशनवर धडक मोर्चा काढला. महाविद्यालयाच्या जबाबदार व्यक्तिविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

विद्यार्थ्यांनी पोलिस स्टेशनच्या आवारात कॉलेज प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजीही केली. पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी मृत सचिनच्या ‍वडिलांसोबत चर्चा केली. दरम्यान, एमआयटीच्या प्राचार्या हेलन राणी यांना निलंबित केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg