Breaking News
Home » Breaking News » सध्याचं सरकार जनविरोधी – शरद पवार

सध्याचं सरकार जनविरोधी – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सामान्य माणसांना दिलासा देण्यासाठी जी पावलं उचलायला हवी होती, ती उचलली गेली नाहीत. सध्याचं सरकार जनविरोधी असून चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्यानेच जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे, अशी जोरदार टीका शरद पवार यांनी केली. विरोधकांनी रामलिला मैदानावर सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला संबोधताना शरद पवारांनी हा हल्ला चढवला. ३० ते ४० वर्षात काहीच झालं नाही. चार वर्षातच आम्ही बहादुरी गाजवली असं या सरकारचं म्हणणं आहे. खरं आहे. या सरकारने चार वर्षात मोठी बहादुरी केलीय. या सरकारने चार वर्षात गॅसचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले ही बहादुरी केली. इंधन दर गगनाला नेऊन ठेवले ही बहादुरी केली. आंतराराष्ट्रीय बाजारात रुपया घसरला ही बहादुरी केली, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. आपण सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलो आहोत, हे सत्ताधाऱ्यांनी मान्य केलंच पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »