Breaking News
Home » Breaking News » सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करा -जितेंद्र आव्हाड

सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करा -जितेंद्र आव्हाड

 

नक्षलवाद्यांचा वकील म्हणून गडलिंगना अटक करण्यात येते तर मग सनातनचे वकील संजीव पुनाळेकर हे तर बॉम्बस्फोटातल्या आरोपींचे खुलेआम समर्थन करत आहेत त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक व्हायला हवी अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊतच्या घरी धाड टाकून स्फोटके पकडली. ही सगळी स्फोटके मराठा आंदोलनात घातपात घडवण्यासाठी होती असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या संदर्भातले ट्विटच जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. महाराष्ट्रात अराजक माजेल यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. वैभव राऊतच्या घरी सापडलेली स्फोटके मराठा आंदोलनात घातपात घडवण्यासाठी होती असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

नालासोपारा या ठिकाणी केलेल्या कारवाईनंतर राज्यातल्या विविध भागांमधून १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर या ठिकाणाहून या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. नालासोपाऱ्यातील भांडार आळीतल्या घरातून २० देशी बॉम्ब आणि ५० बॉम्ब बनवण्याचे साहित्य एटीएसच्या पथकाने जप्त केले. तसेच हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊत, शरद कळसकर या दोघांना तर शिवप्रतिष्ठान या संभाजी भिडे यांच्या संघटनेशी संबंधित सुधन्वा गोंधळेकरला एटीएसने अटक केली आहे. या सगळ्यांवर एटीएस अन्याय करत आहे असा आरोप संजीव पुनाळेकर यांनी केला आहे. अशात आता जितेंद्र आव्हाड यांनी मराठा आंदोलनात घातपात घडवण्याचा कट होता असा आरोप केला आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »