Breaking News
Home » बातम्या » साताऱ्यात विनोद तावडे यांच्यावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न

साताऱ्यात विनोद तावडे यांच्यावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न

सातारा – सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चिघळला असतानाच या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मल्हार क्रांतीच्या एका कार्यकर्त्याने साताऱ्यातील कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही वेळ कार्यक्रमात गोंधळ उडाला. या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला आज तावडे उपस्थित होते. तावडे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर अचानक मल्हार क्रांतीचा कार्यकर्ता मारुती जानकर याने तावडे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. ‘विनोद तावडे मुर्दाबाद’ अशा घोषणा त्याने दिल्या. त्यानंतर तावडे यांच्यावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न केला. सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्याने केली. यावेळी नगरसेवक धनंजय जांभळे आणि विठ्ठल बलशेटवार यांनी जानकरला रोखले. दरम्यान, पोलिसांनी जानकर याला ताब्यात घेतले. दरम्यान, तावडे यांच्यावर बुक्का पडला नाही, असे रयत शिक्षण संस्थेने सांगितले.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »