Sunday , 16 December 2018
Breaking News
Home » Breaking News » सावरकर पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न

सावरकर पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न

औरंगाबाद:

देशभरात सुरू असलेल्या पुतळा विटंबनाच्या घटनांचे लोण औरंगाबादपर्यंत पोहोचले आहे. समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला काल, शुक्रवारी रात्री अज्ञातांनी डांबर लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. त्यामुळं परिसरात तणाव निर्माण झाला होता. अग्निशमन दलाला पाचारण करून पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली.

या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात यावी, यासाठी शिवसेना, भाजप आणि ब्राह्मण समन्वय समितीच्या वतीने रास्ता-रोकोही करण्यात आला. भाजपचे आमदार अतुल सावे, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, राजू वैद्य, ऋषिकेश खैरे, सचिन खैरे, भाऊ सुरडकर, आशिष सुरडकर, लक्ष्मीकांत थेटे हेही घटनास्थळी दाखल झाले. समाजकंटकांना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली. आरोपीला अटक करा; अन्यथा शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पोलिसांची जबाबदारी असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शहरातील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयासमोरच हा प्रकार घडला. महापौर नंदकुमार घोडेले यांनीही घटनास्थळी भेट दिली. सध्या समर्थ नगर भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg