Breaking News
Home » Breaking News » सिडकोच्या २४ एकर जागेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने हजारो कोटींचा घोटाळा-काँग्रेस

सिडकोच्या २४ एकर जागेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने हजारो कोटींचा घोटाळा-काँग्रेस

नवी मुंबईत सिडकोच्या २४ एकर जागेबाबत मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने हा हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यामध्ये मंत्रालयातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिडकोच्या ताब्यातील या जागेची किंमत बाजारभावाप्रमाणे १६०० कोटी रुपये इतकी आहे. मात्र, ती केवळ ३ कोटी रुपयांत बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दिलेल्या संबंधीत आठ शेतकऱ्यांच्या नावे  ही जागा आहे. सिडकोच्या ताब्यातील या जागेचा व्यवहार पनवेल तहसिल कार्यालयाने केला आहे. यावर सिडकोने कुठलाही आक्षेप घेतला नाही. उलट सिडकोने मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहून ही जागा डिनोटिफाईड करीत असल्याचे सांगितल्याचे निरुपम यांनी सांगितले.

हा व्यवहार ३७१ रुपये प्रति चौरस मीटर दराने झाला आणि सध्या या भागातला दर प्रति चौरस मीटर १.८४ लाख रुपये इतका आहे. या व्यवहारामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केलेले नाही तर सगळ्यांचीच धूळफेक केली गेलेली आहे. बागेसाठी राखीव असलेला भूखंड मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्याच्या व त्यांच्याशी संबंधित बिल्डरांच्या घशात घातला व तब्बल १६०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या व्यवहरातील रक्कम भाजपाला निधी म्हणून देण्यात येणार असल्याचा गंभीर आरोपही निरुपम यांनी केला आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »