Breaking News
Home » Breaking News » सेवा निवृत्ती निमित्त देवेंद्र भुजबळ यांनास्नेहपूर्ण निरोप

सेवा निवृत्ती निमित्त देवेंद्र भुजबळ यांनास्नेहपूर्ण निरोप

सेवा निवृत्ती निमित्त देवेंद्र भुजबळ यांनास्नेहपूर्ण निरोप

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या औरंगाबाद येथील मराठवाडा विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतर्फे संचालक ( माहिती ) देवेंद्र भुजबळ यांना सेवानिवृत्ती निमित्त अतिशय स्नेहमय वातावरणात लातूरचे माहिती उपसंचालक यशवंत भंडारे यांच्या हस्ते सस्नेह निरोप 31 जुलै 2018 रोजी दुपारनंतर देण्यात आला ….

यावेळी भुजबळ यांच्या सुविद्य पत्नी अलका भुजबळ, कन्या देवश्री भुजबळ, लातूर विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माहिती विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी भुजबळ म्हणाले, अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून यशाकडे वाटचाल केली. अपयशाला सामोरे गेलो. परंतु अपयशामुळे खचलो नाही. दूरदर्शनच्या सहा वर्षाच्या आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या साडेसव्वीस वर्षाच्या सेवेत लोकांकडून प्रेरणा घेतली. लोकांना प्रेरित केले. सामान्य माणसेही प्रेरणास्त्रोत असू शकतात, हे गगनभरारी पुस्तकातून लोकांसमोर आणले…

भुजबळ यांच्या एकूणच कार्यशैलीबाबत यशवंत भंडारे यांनी सविस्तर विवेचन केले. यामध्ये त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील काम अधिकारी –कर्मचाऱ्यांना आदर्शवत आहे…. दूरदर्शन, वृत्तपत्रातील कामाचा दीर्घ अनुभव, जनसंपर्क क्षेत्रातील संबंध याबाबतही भुजबळ यांच्याबाबत उपस्थितांना माहिती दिली…. त्यांच्या कार्याचा इतरांनाही आदर्श घ्यावा, असे आवाहन केले…. तसेच औरंगाबाद, लातूर विभागाच्यावतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या … त्याचबरोबर त्यांच्या हातून या पुढील काळात समाजासाठी लेखन व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली…

प्रारंभी विभागाच्यावतीने भुजबळ दाम्पत्यांचा औरंगाबाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने भेट वस्तू, पुष्प गुच्छ देऊन यशवंत भंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला …

कार्यक्रमात युनुस अलम सिद्दीकी, एन. आर. इनामदार, मुकुंद चिलवंत, श्रीमती वंदना थोरात, श्याम टरके, यशवंत सोनकांबळे, संजय परदेशी, कैलास म्हस्के, सुभाष पवार,संजय परदेशी, अशोक खरात यांनी … भुजबळ यांच्या कार्याबाबत, सहवासाबाबत मनोगत व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजिवनी जाधव यांनी केले …

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »