Breaking News
Home » Uncategorized » १३ हजार बालकांचा झाला मृत्यू कुपोषणामुळे

१३ हजार बालकांचा झाला मृत्यू कुपोषणामुळे

मुंबई – आयुष्यातील पहिल्या २८ दिवसांत ६५ टक्के बालकांचा मृत्यू झाला, तर २१ टक्के बालके २८ दिवस ते एक वर्ष या कालावधीत दगावली आणि एक ते पाच वर्षे या वयामध्ये १४ टक्के बालकांचा मृत्यू झाला, दरम्यान, एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीमध्ये १३,५४१ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

आपल्या विकसनशील देशापुढे कुपोषण व अ‍ॅनिमिया या दोन मुख्य समस्या आहेत. ५ वष्रे वयाखालील ५४ दशलक्ष बालकांपैकी एकूण ४८ टक्के बालकांची वाढ खुंटली आहे, तर पाच वर्षाखालील ६९.५ टक्के बालकांना अ‍ॅनिमिया आहे. पोषक अन्नाचा व आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने आदिवासी भागातील महिला व बालकांना कुपोषण व अन्य संबंधित आजार होत असल्याचे समोर आले आहे.

राज्य सरकार आणि नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स (एनजीओ) हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. अदाणी फाउंडेशन गेली अनेक वष्रे समाजाच्या आरोग्यासाठी सातत्याने काम करत आहे. फाउंडेशन विविध उपक्रमांच्या माध्यमातून गेली काही वष्रे या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहे. यातील एक उपक्रम म्हणजे ’सुपोषण’. या उपक्रमाचे उद्दिष्ट किशोरवयीन मुली व प्रजोत्पादन वयातील महिला यांना कुपोषण व अ‍ॅनिमिया यांच्या विळख्यातून सोडवणे, हे आहे.

फाउंडेशन बाधित क्षेत्रांतील कुटुंबांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या अन्नसेवनाच्या सवयी व आहाराच्या सवयी बदलण्याबाबत जागृती केली जाणार आहे. सुपोषण उपक्रमांतर्गत संगिनी या आणखी एका कार्यक्रमामुळे, अ‍ॅनिमियाला प्रतिबंध करणे व त्यातून बरे होणे या उद्देशाने महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी मदत झाली आहे, तसेच २० हजारांहुन अधिक कुटुंबांचे नियमित समुपदेशन केल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. प्रीती अदाणी यांनी सांगितले.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »