Breaking News
Home » Breaking News » २१ विरोधी पक्ष भारत बंद मध्ये सामिल, पेट्रोल डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणण्याची काँग्रेसची मागणी

२१ विरोधी पक्ष भारत बंद मध्ये सामिल, पेट्रोल डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणण्याची काँग्रेसची मागणी

भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या २१ विरोधी पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला.सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे शिवसेनेने बंदला पाठिंबा दिलेला नाही. तर मनसेने मात्र बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

हे आंदोलन नागरिकांना दिलासा देण्यासाठी आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेचे, व्यापाऱ्यांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.

सुब्रमण्यम स्वामींचा भाजपाला घरचा अहेर

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधात विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थतज्ज्ञ आणि भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरावरून आपल्याच पक्षाला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. जनता विद्रोह करण्यासाठी रस्त्यावर येईल, इतकेही सरकारने पेट्रोलचे दर वाढवू नयेत, असे स्वामी यांनी म्हटले आहे. ‘एएनआय’शी बोलताना स्वामी म्हणाले की, मला वाटतं की, अर्थशास्त्रानुसार पेट्रोलच्या किमती या ४० रूपये असायला हव्यात.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »