Breaking News
Home » बातम्या » _भारतीय गृहयुद्धाची नांदी, वेळीच धोका ओळखुया आणि रोखुया_

_भारतीय गृहयुद्धाची नांदी, वेळीच धोका ओळखुया आणि रोखुया_

 1. 💣🔫 *या बॉम्ब बंदुका कशाला ? आर एस एस जवाब दो ‼*
  ★ _आर एस एस चा विनापरवाना शस्त्रसाठा जप्त केला जावा या मागणीसाठी…_
  *नेतृत्व: ऍड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर*
  ♦ *धरणे आंदोलन* ♦
  *दि. ११ ऑक्टोबर २०१८ रोजी,*
  🕐 *दुपारी ठीक १ वाजता,*
  📍 *स्थळ- सी.एस.एम.टी.*
  ✊🏻 *आयोजक- हिंसेविरुद्ध सामाजिक संघटनांची आघाडी*

_भारतीय गृहयुद्धाची नांदी, वेळीच धोका ओळखुया आणि रोखुया_

लोडेड बंदुका, धारदार तलवारी, सब-मशीन गन, एन एस जी असौल्ट रायफल, सेमी ऑटोमॅटिक रायफल, ए के सिरीज असौल्ट रायफल, जिवंत काडतूसं अशी अनेक घातक हत्यारं.. टेबलवर ठेवलेली आहेत.. हे कुठल्या सैन्याच्या किंवा पोलिसी शस्त्रागारातील दृश्य नसून दसरा या सणाच्या दिवशी चालणाऱ्या एका पूजेतील दृश्य आहे.. जिथे बंदुकांसोबत झेंडूची फुलं सजवलेली आहेत आणि या शस्त्रांची पूजा केली जात आहे.. कोण करतंय पूजा ? तर (देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कुठेही नसली तरी) या देशातील सर्वात देशप्रेमी म्हणून स्वतःस पुन्हा पुन्हा मिरवणारी लोकं.. खाकी चड्डी वाली संघाची लोकं.. मग यात त्या नुकतंच शाळेत जाऊ लागलेल्या लेकरापासून विद्यार्थी, तरुण, वृद्ध असे सगळेच संघाचे स्वयंसेवक .. त्यांचे वरिष्ठ पदाधिकारी.. आणि यासोबत चक्क.. नरेंद्र मोदींसारखे नेते, मंत्री मंडळी.. हे सगळं काय चाललंय..?
११ फेब्रुवारी ला बिहारच्या मुजफ्फरपूरमधील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी म्हटले की, “संघाच्या कार्यकर्त्यांची शिस्त व क्षमता भारतीय सैन्याच्या सैनिकांच्या बरोबरीची आहे. जर देशाला युद्धाच्या काळात गरज पडली आणि संविधान परवानगी देईल तर संघाचे कार्यकर्ते केवळ तीन दिवसात सैनिक बनून तयार होऊ शकतात, ज्यासाठी भारतीय सेनेला सहा ते सात महिने लागू शकतात.”
या वक्तव्यावरून आम्हा संविधानप्रेमी भारतीय नागरिकांना काही प्रश्न पडतात,
१. स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणवणाऱ्या संघाकडे भारतीय सैन्याच्या तोडीचे हत्यारबंद सैन्य कसे काय तयार असू शकते?
२. भारतीय सेनेला युद्धास तयार होण्यास तीन महिने लागतील आणि संघाला फक्त तीन दिवस? संघाची सशस्त्र युद्ध कौशल्यांत इतकी पूर्वतयारी कुठे आणि कशी चालते? आणि यामागचा उद्देश्य काय ?
३. आपल्या देशाच्या संविधानाने अमेरिकन संविधानाप्रमाणे नागरिकांना शस्त्र बाळगण्याची परवानगी दिलेली नाही तर मग भारताची सेना युद्धासाठी सक्षम असतानाही एका संघटनेकडे इतकी शस्त्रास्त्रे कशी काय? ती कुठून आली?
४. देशात एक व्यवस्था काम करत असताना ही समांतर व्यवस्था कशासाठी? स्वतःला सर्वाधिक देशभक्त म्हणवणाऱ्या व भारतीय सैनिकांच्या शौर्याची उदाहरणे देत फिरणाऱ्या संघाचा भारतीय सैन्यावर, सैनिकांच्या क्षमतेवर विश्वास नाही का?
५. नागपूर मध्ये दर दसऱ्याला संघाकडून आपल्या शस्त्रांची पूजा होणं, त्यातून होणारं शक्तीप्रदर्शन.. ही शक्ती, ही हत्यारं कोणाविरुद्ध वापरायची आहेत?
६. गेल्या काही वर्षांतील देशातील अल्पसंख्याक, दलित-बहुजन, महिला व इतर घटकांवर होणारे हल्ले वाढले आहेत. कोण आहेत ही लोकं ??? यांचा आणि संघाच्या शस्त्रसाठ्याचा व शस्त्रसज्जतेचा संबंध नाही का?
७. चार्वाकापासून संत तुकारामांपर्यंत कुठेही शस्त्रपूजेचा उल्लेख नाही. शस्त्राची पूजा ही हिंसक आहे. मुळात शस्त्र हे आक्रमणासाठी असते. देशाच्या सुरक्षेसाठी लष्कर तर, अंतर्गत सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा आहे. मग शस्त्राची पूजा करून ते कोणावर चालवायचे आहे?
या प्रश्नांची उत्तरं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेतुपुरस्सर अनुत्तरित ठेवली आहेत. मोहन भागवतांच्या वक्तव्यातून हेही दिसून येते की, भारतीय संविधान संघाच्या सेनेसाठी अडथळा ठरत आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक याही अर्थाने निर्णायक आहे कारण जर का यावेळी भाजप पुन्हा पूर्ण बहुमताने सत्तेत आलं आणि संविधानात बदल करून संघाच्या सेनेला परवानगी दिली गेली तर मग संपलाच विषय.. हिंदूराष्ट्रनिर्मितीसाठी भारतीय गृहयुद्ध… ज्यात मारले जातील ते ते, जे जे आर. एस. एस. च्या ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेच्या विरोधात आहेत किंवा अडथळा ठरत आहेत.. म्हणजेच इथले दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन व इतर धार्मिक अल्पसंख्यांक… इथले निर्भीड पुरोगामी पत्रकार, विचारवंत, साहित्यिक .. ते सर्व जे संघाच्या या ‘हिंदू राष्ट्र संकल्पनेवर प्रश्न उपस्थित करत आहेत..
हा एक मोठा धोका आहे दोस्तांनो, ही भारतीय गृहयुद्धाची नांदी आहे, संविधान बदलून मनुस्मृतीचे राज्य येण्याची नांदी आहे. शांतताप्रिय व संविधानप्रेमी व्यक्तींनी व समूहांनी एकत्र येऊन याला अटकाव करण्याची गरज आहे…आपल्या चिल्या-पिल्यांसाठी, येण्याऱ्या पिढीसाठी काय आपण हा देश सुरक्षित ठेवू शकू? उन्मादाने माजलेल्या तलवार, त्रिशूळ, बंदूकधारी झुंडी दिवसाढवळ्या निरपराधांचे मुडदे पाडत आहेत… काय या भितीपासून आपण आपल्या स्वतःलाच भयमुक्त करणार आहोत का? असे प्रश्न व चिंता आम्हाला वाटत आहेत आणि या संघाच्या अवैध शस्त्रसाठ्यावर त्वरित कारवाई व्हावी असे वाटत आहे…धर्माच्या नावावर चाललेल्या या अतिरेकी कारवाया थांबवण्यासाठी आपलं पहिलं पाऊल हे राहू शकत की, आपण अशी मागणी करूया की, संघाने आपली शस्त्रास्त्रे भारत सरकारकडे सुपूर्द करावी अन्यथा भारत सरकारने ती जप्त करावीत..
याच उद्देशाने आपण विविध NGO, सामाजिक संस्था-संघटना एका धरणे निदर्शनासाठी गुरुवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर जमणार आहोत. देशाचे संविधान, लोकशाही वाचवण्याची आपली जबाबदारी ओळखून एकत्र येऊया.. आणि समतेसाठीचा, शांततेसाठी संघर्ष करूया.. इथं कुठलीच गोष्ट फुकट किंवा मेहनतीशिवाय मिळत नसते.. सुरक्षितता व शांतताही त्याला अपवाद नाही..

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »