Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Author Archives: Admin

Author Archives: Admin

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या वार्तांकनात प्रसार माध्यमांची कोताही!

समर्थ रामदासांनी दासबोध या ग्रंथात (दशक दुसरा, समास पहिला) मूर्ख माणसाची लक्षणे वर्णिली आहेत. त्यातील काही लक्षणे अशी: “अक्षरें गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं । नीघा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ॥ ७०॥ आपण वाचीना कधीं । कोणास वाचावया नेदी । बांधोन ठेवी बंदीं । तो येक मूर्ख ॥ ७१॥” या निकषावर आपण मूर्ख ठरणार नाही ... Read More »

दिल्लीत जमलेल्या पोशिंदासाठी माध्यमं मूक-बधिर!

दिल्लीतलं आज आणि उद्याचं शेतकरी आंदोलन आम्हाला का दिसत नाही. . . . . शेतक-यांच्या प्रश्नांसाठी अंदोलनाच्या माध्यमातून आज आणि उद्या देशभरातील 200 पेक्षा अधिक शेतकरी संघटनांचे शेतकरी बांधव दिल्लीत एकत्र आले आहेत. शेतक-यांच्या प्रश्नांवर चर्चा होण्यासाठी 21 दिवसाचे संसदेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी करणार आहेत. महाराष्ट्रात मात्र या दोन दिवशी आरक्षणाचा कलगितुरा रंगणार आहे. राज्यात सद्यस्थितीत ओबीसी मध्ये असणारे आणि ... Read More »

संविधान दिनानिमित्त कामोठेत खो खो स्पर्धा संपन्न

संविधान दिना चे औचित्य साधून ब्रदर्स ग्रुप कामोठे यांच्या वतीने 26 व 27 नोव्हेंबर दरम्यान भव्य खो खो स्पर्धेचे(संविधान चषक) आयोजन केले होते.सदर स्पर्धे मध्ये रायगड,नवी मुंबई परिसरातील संघाने सहभाग नोंदवला होता.स्पर्धा लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम शाळेच्या ग्राउंड वर भरविण्यात आली होती.प्रथम क्रमांकाचे पारितोषिक फिनिक्स असोशियन पनवेल या संघाने पटविले तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक नवयुवक क्रीडा संघ कळंबोली यांनी ... Read More »

समानतेचे कृतिशील पुरस्कर्ते – तात्यासाहेब जोतिबा फुले

आज जोतीराव फुले यांचा 128 वा स्मृतीदिवस. वर्ण,जात आणि लिंगभेदी पितृसत्ताक व्यवस्थेवर जोतिरावांनी अचूक बोट ठेवले. आज फुले वाड्यावर गर्दी करणाऱ्या भक्तांनी आधी फुले नीट समजून घ्यावेत. आजही ते सगळेच पचणार नाहीत, पण पचवता आले तेवढे पचवावेत. नाहीतर आज आपण फुले वाड्यावर फेरी मारणार आणि उद्या श्रीरामाच्या पालखीचे भोई बनणार.ही आपल्या जगण्यावागण्यातील विसंगती आता तरी संपावी.नाहीतर खंडोबा, जोतिबाप्रमाणे अजून एक ... Read More »

विभागीय माहिती कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

औरंगाबाद, दि. 26 : येथील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालयात संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राज्यघटनेतील उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच यावेळी 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संचालक (माहिती) यशवंत भंडारे यांनी भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना संविधानाचे महत्व पटवून सांगितले. यानंतर ... Read More »

आंबेडकरी दृष्टीकोनातून भारतीय राजकारणाची समिक्षा- डॉ. सुरेश माने, भाग १

https://youtu.be/H5e6G7JFYXM आगामी काळात देशात २०१९ ला होणाऱ्या लोकसभा निवडणूका आणि त्यात परिवर्तनवादी राजकीय पक्षांची भूमिका, राजकीय आघाडी, आणि स्वपक्षाच्या वास्तव शक्ती आणि निवडणूकीत येणारे निकाल याविषयी चे अंदाज नेमके काय असतील याचे परखड विश्लेषण आणि अंदाज थेट त्या त्या पक्षांच्या नेत्यांकडून जाणून घेत असतानाच एकूण राजकीय भाष्य करणारा 3 Ways Media च्या विशेष कार्यक्रमात राजकीय नेत्यांच्या खास मुलाखती. यातील पहिला ... Read More »

अर्थकारणातील जातीय राजकारण!

मुंबईच्या बेलार्ड पिअर भागातील एका छोट्याश्या उपाहारगृहात मी आणि माझा किशोर नावाचा एक मित्र चहा घेत होतो. समोर तिघे जण नाश्ता करित होते. त्यांच्या बोलण्यातून ते भाजपचे कार्यकर्ते नसले तरी समर्थक होते. त्यांच्या बोलीभाषेवरून ते ग्रामीण भागाचे आणि विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील असल्याचे जाणवत होते. त्यातल्या एकाचे म्हणणे होते की, या सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. तर दुसरा म्हटला अर् काही का ... Read More »

स्त्री स्वातंत्र्याचा विचार म्हणजेच बुद्ध धम्मक्रांती -प्रा.डॉ.संबोधी देशपांडे

शहादा:::- विषमतावादी ब्राह्मणी संस्कृतीने स्त्रियांना चूल व मूल एवढ्याच चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न केला.. मनुस्मृतिने तर शूद्रांपेक्षा हिन दर्जा देत स्वातंत्र्य नाकारले.मात्र तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी बुद्ध धम्मच्या माध्यमातून केलेल्या समतेच्या विचारातूनच स्त्री स्वातंत्र्याचा विचार उदयास आला.यामुळे धम्म आणि डॉ.बाबसाहेबांची विचार धारा मानणाऱ्या सर्वानीच आपल्या घरापासूनच स्त्रियांना समतेची वागणूक दिली पाहिजे असे प्रतिपादन प्रा.डॉ.संबोधी देशपांडे यांनी केले…. शहादा येथील राजमाता ... Read More »

चैत्यभूमी येथे राष्ट्रध्वज लागलाच पाहिजे – भारतीय लोकसत्ताक संघटनेची मागणी 

  मुंबई :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्र उभारणारे महामानव असून संपूर्ण भारतीयांसाठी त्यांनी कार्य केले असल्याचे सांगत मुंबईतील चैत्यभूमी येथे राष्ट्रध्वज उभारला गेला पाहिजे, अशी आग्रही मागणी करित भारतीय लोकसत्ताक संघटनेने आज आंदोलन केले. यावेळी संघटनेचे अमोलकुमार बोधिराज आणि सहकारी उपस्थित होते.  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य कोणत्या एका जाती धर्मापुरते मर्यादित नसून अंखड भारत वासीयांसाठी मानव कल्याणाचे ... Read More »

IMG-20160507-WA0000.jpg