Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » देश-विदेश

देश-विदेश

डॉ. राहुल गजभिये यांची वर्ल्ड एंडोमेट्रिओसीस सोसायटीच्या राजदूतपदी निवड

मुंबई, गुरुवार (प्रतिनिधी) – प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान येथील वैद्यकीय शास्त्रज्ञ डॉ. राहुल गजभिये यांची नुकतीच वर्ल्ड एंडोमेट्रिओसीस सोसायटीचे भारतीय राजदूत म्हणून निवड झाली आहे. व्यांकोअर कॅ नडा येथे स्थित वर्ल्ड एंडोमेट्रिओसीस सोसायटी स्त्रियांच्या गर्भाशय संबंधित विकारांवरील संशोधनासाठी जगातील एक अग्रगण्य संस्था मानली जाते. जगभरातील वैद्यकीय शास्त्रज्ञ या संस्थेशी संलग्न आहेत. वैद्यकीय शिक्षणात एमबीबीएस केल्यानंतर त्यांनी वैद्यकीय चिकित्सा संशोधनात संशोधन ... Read More »

२०१९ ची आगामी लोकसभा निवडणूक ही भाजप-आरएसएस विरुद्ध विरोधी पक्ष-राहुल गांधी

२०१९ ची आगामी लोकसभा निवडणूक ही भाजप-आरएसएस विरुद्ध विरोधी पक्षात होईल, असे सांगत  जर्मनी दौऱ्यानंतर ब्रिटनमध्ये पोहोचलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते प्रसिद्ध ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक’मधील भारतीय विद्यार्थ्यांशी बोलत होते. भारतात बेरोजगारी हे मोठे संकट आहे. परंतु, केंद्रातील मोदी सरकार हे मानायला तयार नाही. एकीकडे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन ... Read More »

मुस्लीम ब्रदरवुडच्या संकल्पनेशी आरएसएसची संकल्पना मिळतीजुळती-राहूल गांधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाभारतातल्या संस्थांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्नअसल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केला आहे. लंडनमध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्ट्रेटेजिक स्टडीज येथे शुक्रवारी ते बोलत होते. गांधी हे सध्या जर्मनी व इंग्लंडच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. मुस्लीम ब्रदरहूड या अनेक अरब देशांनी दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या संघटनेशी गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना केली.  भारतातल्या दिग्गजांनी ज्या संस्थांची गेल्या काही ... Read More »

येत्या २ दिवसात मान्सून आनंद घेणार महाराष्ट्र.

मोसमी पाऊस पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र व गोव्यात पोहोचेल असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने या आठवडय़ात जोरदार व दमदार पाऊस राहील असा अंदाज दिला आहे. ६ ते १० जूनदरम्यान मुंबईत खूपच जास्त पावसाची शक्यता असून लोकांनी घरात राहणे पसंत करावे असा इशारा  देण्यात आला आहे. स्कायमेटने म्हटले आहे की, मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर ८ जून ... Read More »

शेतकरी आंदोलन !

१ जूनपासून सुरु झालेल्या शेतकऱ्यांच्या ‘किसान अवकाश’ या आंदोलनामुळे देशातील इतर भागात बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या शेतमालावर परिणाम झालेला जाणवला. त्यामुळे भाज्यांच्या किंमती वाढलेल्या होत्या. दरम्यान, देशभरातील अनेक भागात शेतकऱ्यांनी दूध आणि भाज्या रस्त्यांवर फेकून देत आपला विरोध दर्शवला. काल आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकरी काही प्रमाणात आक्रमक झालेले पहायला मिळाले. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि हरयाणात विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यांवर दूध ओतून ... Read More »

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) नियमावलीत लवचिकता .

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) नियमावलीत लवचिकता आणून रखडलेले प्रस्ताव मार्गी लावण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. काही नियम शिथिल करून नवे धोरण अमलात आणले जाणार असून, यामुळे योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी होईल, अशी आशा राज्य सरकारला आहे. शहरातील झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार आणि महापालिकेच्या सहकार्याने ही योजना राबविण्याचे नियोजन आहे. त्यानुसार विविध भागांतील २४० प्रकल्प उभारणीचे नियोजन ... Read More »

नागपूरला पावसाळी अधिवेशन .

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या चार जुलैपासून नागपुरातच होणार असल्याचे स्पष्ट झाले. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधिमंडळाची बैठक नागपूरला होणार असल्याचे निर्देश दिले आहेत. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर चार जुलैपासून अधिवेशन होणार असल्याचे स्पष्ट केले होते; परंतु अधिवेशनाला एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला असतानाही अधिवेशन नेमके कुठे होईल, याबद्दल स्पष्टता नव्हती. पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याबद्दल मुख्यमंत्री आग्रही होते; ... Read More »

 सहकारमंत्री अडचणीत !

सोलापूरमध्ये अग्निशमन केंद्रासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अलिशान बंगला बांधल्याप्रकरणी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुखअडचणीत येण्याची चिन्हे आहेत. बंगल्याचं बांधकाम बेकायदा असून, त्याचा परवाना मागे घेतल्याचा अहवाल महापालिकेनं उच्च न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणावरून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अग्निशमन केंद्र आणि व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर देशमुख यांनी अलिशान बंगला बांधला आहे. बंगल्याच्या बांधकामास परवानगी दिल्याप्रकरणी महापालिकेवर कारवाई करण्यात यावी, अशा ... Read More »

शेतकरी संपावर !

संपूर्ण कर्जमा फी, वीजबिल माफी, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी देशासह राज्यातील बळीराजा शुक्रवारपासून संपावर गेला आहे. आता १० दिवस शेतकरी संपावर असून या कालावधीत दुधासह अन्य शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणला जाणार नाही.संपूर्ण कर्जमाफी व शेतमालास उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतक-यांनी राज्यात संप पुकारला होता. या संदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरानंतरही पूर्तता ... Read More »

IMG-20160507-WA0000.jpg