Friday , 15 December 2017
Breaking News
Home » बातम्या

बातम्या

‘१३०० शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट’

नागपूर – राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. या संबंधी आमदार कपिल पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्दयावर दोन वेळा गोंधळ होऊन सभागृह बंद पडले. शिक्षणासंदर्भातील सरकारचे धोरण किती दुटप्पी आणि उदासिन आहे हे लक्षात आले. राज्यातील १३०० च्यावर शाळा बंद करण्याचा डाव शिक्षणमंत्र्यांनी चालू केला आहे. ... Read More »

वादामुळे सिनेमा थांबू नये

कोल्हापूर – आपल्या देशात करोडो लोक राहतात. हजारो समाज आहेत. त्यांची संस्कृती, इतिहास याच्याशी जोडलेल्या परंपरांमध्ये वैविध्य आहे. साहजिकच यावर बेतलेल्या सिनेमामुळे वाद होतच राहणार. वाद यापूर्वीही होते आणि भविष्यातही होतील. पण वाद होईल म्हणून सिनेमाची भाषा मूक होऊ नये. ती एक अभिव्यक्ती आहे. त्यातून समाजाने काय चांगले घ्यायचे आणि कुठे दुर्लक्ष करायचे एवढी प्रगल्भता रसिकांमध्ये येणेही महत्वाचे आहे, अशा ... Read More »

एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांच्या कपाळावर नंबर टाकणं चुकीचं – हायकोर्ट

मुंबई – मुंबईतील एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कपाळावर नंबर टाकल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला झापलं आहे. एल्फिन्स्टन स्टेशनवरील ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कपाळावर नंबर टाकणं चुकीचं असल्याचं मत हायकोर्टाने व्यक्त केलं. मृतदेहांचाही सन्मान करायला हवा, अशा शब्दात हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं. डॉक्टरांनी शवविच्छेदन करताना कपाळावर स्केचपेननं नंबर टाकल्याची माहिती यावेळी राज्य सरकारने दिली. जाब विचारणाऱ्या ... Read More »

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहीली

https://youtu.be/eRWiR14s0Ek अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि लंडनमधील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या पीएचडी आणि डीएससी या अर्थशास्त्रातील उच्च पदव्या घेणारे एकमेव भारतीय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत! अशा शब्दात जेष्ठ अर्थतज्ञ तथा माजी खासदार व नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहीली! 3 Ways Media Tv चा महापरिनिर्वाण दिन विशेष रिपोर्ट! पहा आणि ... Read More »

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

साहित्यित अर्जुन व्हटकर यांच्या तीन पुस्तकांचे सोलापूर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. Read More »

शाहीद ठरला यंदाचा ‘सेक्सीएस्ट एशियन मॅन’

लंडन – बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ अर्थात अभिनेता शाहीद कपूर आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. जगभरात असंख्य चाहते असलेल्या या अभिनेत्याने यंदाचा ‘सेक्सीएस्ट एशियन मॅन’चा किताब पटकावलाय. विशेष म्हणजे हृतिक रोशनला मागे टाकत त्याने हा बहुमान पटकावलाय. ‘सेक्सीएस्ट एशियन मॅन’ म्हणून शाहीदची निवड होताच त्याने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘हा किताब मिळणे ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.तुमच्या ... Read More »

मानसिंग बोंद्रेला न्यायालयीन कोठडी

कोल्हापूर – कर्नाटकातील उद्योजकावर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेला मानसिंग विजयराव बोंद्रे (वय ३०, रा. रंकाळा परिसर) याला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, बोंद्रे याची तब्येत बिघडल्याने त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. बांधकाम व्यावसायिक आणि श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मानसिंग बोंद्रे याने मंगळवारी पहाटे ताराबाई पार्कातील वृषाली ... Read More »

जळगाव-मुंबई ‘उडान’ २३ डिसेंबरपासून

जळगाव – जळगावकरांचे विमानसेवेचे कित्येक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार असून येत्या २३ डिसेंबरला जळगावहून मुंबईकडे पहिले विमान उड्डाण होणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्यावतीने देशातील प्रमूख शहरे विमानसेवेने जोडण्यासाठी उडाण (उडे देशका आम नागरिक) योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील दहा शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये पहिल्या ... Read More »

भारतीय बुकी अॅशेस कसोटी फिक्स करणार होते

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यानच्या प्रतिष्ठीत अॅशेस मालिकेवरही फिक्सिंगचे आरोप लागले आहेत. दोन भारतीय बुकी अॅशेस मालिकेतील तिसरी कसोटी फिक्स करण्यासाठी आले होते, असा दावा इंग्लंडच्या एका वृत्तपत्राने केला आहे. पर्थ स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान अॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामाना सुरू असतानाच या वृत्तपत्राने केलेल्या दाव्यामुळे क्रिकेट जगत हादरून गेलं आहे. ‘द सन’ या वृत्तपत्राने हा दावा ... Read More »

जीएसटीआधीच्या जुन्या स्टॉकचा महासेल लवकरच

नवी दिल्ली – जीएसटी लागू होणार होता त्याआधी कपडे, अन्य वस्तूंचा जुना स्टॉक काढून टाकण्याची व्यापाऱ्यांची लगबग सुरू होती. हीच लगबग आता वर्षअखेरीस सुरू होण्याची दाट शक्यता आहे. ग्राहकांची यामुळे चांदी होणार आहे. दोन कारणांमुळे जुना स्टॉक काढून टाकणे व्यापाऱ्यांना भाग आहे. एकतर जुन्या करप्रणालीत घेतलेला विनाबिलाचा माल जीएसटी लागू झाल्याच्या ६ महिन्यांच्या आत विकला तरच व्यापाऱ्यांना त्यावर इनपुट टॅक्स ... Read More »