Friday , 15 December 2017
Breaking News
Home » बातम्या » अपघात / गुन्हा

अपघात / गुन्हा

दोन एसटींची धडक, केबिनचा चक्काचूर, ड्रायव्हर ठार, 30 जखमी

बीड – दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात, बस चालकाचा मृत्यू झाला, तर 30 पेक्षा अधिक प्रवासी जखमी आहेत. अंबाजोगाई येथून जवळच असलेल्या वरवटी गावाजवळ आज सकाळी 8 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. गंगाखेड – पुणे आणि लातूर – परभणी या दोन बस वेगाने समोरासमोर आल्या. दोन्ही बसवर चालकांचं नियंत्रण राहिलं नाही, त्यामुळे त्या एकमेकींना धडकल्या. या अपघातात ... Read More »

जिशा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा

नवी दिल्ली – केरळमधील जिशा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी अमिरूल इस्लामला गुरूवारी एर्नाकुलम जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. अमिरूल हा आसाममधील स्थलांतरित कामगार असून मंगळवारी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. जिशा बलात्कार प्रकरणानंतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्त्रियांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर अनेक आंदोलने झाली होती. त्यामुळे देशभरात हे प्रकरण गाजले होते. न्यायालयाने मंगळवारी अमिरूल इस्लाम याला ३७६, ३०२, ४४९ आणि ३४२ ... Read More »

‘फिर हेरा फेरी’चे दिग्दर्शक, लेखक अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन

मुंबई – ‘खिलाडी ४२०’, ‘फिर हेराफेरी’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, तर ‘विरासत’, ‘रंगीला’, ‘मन’ या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे गुरुवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. गुजरातमधील भूज येथे १९६३ मध्ये नीरज व्होरा यांचा ... Read More »

कोळसा घोटाळ्यात मधू कोडांचे हात रंगले, कट रचल्याप्रकरणी दोषी

नवी दिल्ली – झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा हे कोळसा घोटाळा प्रकरणी दोषी ठरल्याचा निकाल दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. यूपीएच्या काळात हा कोळसा घोटाळा चांगलाच गाजला. या घोटाळ्यासंबंधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावरही आरोप झाले. मात्र मधू कोडा यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले. त्यांच्यासह इतर चारजणांनाही दोषी ठरवण्यात आले. याआधीही निवडणूक आयोगाने मधू कोडा यांना दणका देत ... Read More »

पुण्यात जुगाराच्या अड्ड्यावर पोलीस अधिकाऱ्यासह ४१ जणांची धरपकड

पुणे – पुण्यातील मुंढवा परिसरात शुक्रवारी रात्री पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी काही पोलीस अधिकारीच जुगार खेळताना आढळून आले. या घटनेमुळे जिल्हातील पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे. विजय जाधव असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक आहेत. त्यांच्यासह अनेकांना पोलिसांनी पकडले आहे. तर क्लब चालक माजी नगरसेवक अविनाश जाधव यांच्यासह ... Read More »

… तर मुंबई पोलिस मुन्ना यादवला अटक करतील – माथुर

नागपूर – गेले 45 दिवस फरार असलेला भाजप नेता मुन्ना यादवला जर नागपूर पोलिस शोधू शकत नसतील, तर त्यांनी मुंबई पोलिसांना सांगावं, आम्ही मुंबईत त्याला अटक करु, अशा शब्दात पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी नागपूर पोलिसांना घरचा आहेर दिला आहे. 21 ऑक्टोबरला दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकणात मुन्ना यादव मुख्य आरोपी आहे. गेल्या 45 दिवसांपासून मुन्ना यादव फरार असून नागपूर ... Read More »

जिवंत मुलाला मृत घोषित करणाऱ्या हॉस्पिटलचं लायसन्स रद्द

नवी दिल्ली – जिवंत चिमुकल्याला मृत घोषित करणाऱ्या मॅक्स हॉस्पिटलवर अखेर दिल्ली सरकारने कारवाई केली आहे. शालीमार स्थित मॅक्स हॉस्पिटलचं लायसन्स रद्द करण्यात आले आहे. जिवंत चिमुकल्याला मृत घोषित केल्याप्रकरणी मॅक्स हॉस्पिटल दोषी असल्याचे समोर आले आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मॅक्स हॉस्पिटलचं लायसन्स रद्द करण्याची घोषणा केली. सत्येंद्र जैन म्हणाले, “मॅक्स हॉस्पिटलला याआधीही नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. ... Read More »

एपीआय अश्विनी ब्रिदे बेपत्ता प्रकरण; पोलीस निरीक्षकाला ठाण्यातून अटक

मुंबई – सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे- गोरे यांचे अपहरण केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना अटक केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून अश्विनी बिद्रे- गोरे या बेपत्ता असून अभय कुरुंदकर यांनीच त्यांचे अपहरण केल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता. पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अश्विनी बिद्रे- गोरे यांची २०१५ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली ... Read More »

मुंबईत अंगावर झाड कोसळल्याने महिलेचा मृत्यू

मुंबई – मुंबईतील चेंबूरमध्ये झाड अंगावर कोसळून आणखी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शारदा घोडेस्वार असं मृत्यू महिलेचं नाव असून ती पांजरापोळ इथली रहिवासी आहे. आज सकाळी 10 च्या सुमारास कामाला जाण्यासाठी शारदा घोडेस्वार डायमंड गार्डन परिसरातील स्टॉपवर बसची वाट पाहत उभ्या होत्या. मात्र त्याचवेळी अचानक झाड अंगावर पडून शारदा यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर शारदा यांना शताब्दी ... Read More »

चॉकलेट हिरो काळाच्या पडद्याआड, शशी कपूर यांचं निधन

मुंबई – बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 79 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे शशी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून शशी कपूर यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. शशी कपूर यांचा जन्म 1938 मध्ये झाला होता. शशी कपूर ... Read More »