Wednesday , 23 May 2018
Breaking News
Home » बातम्या » आरोग्य / वैद्यकीय

आरोग्य / वैद्यकीय

भिवंडीत अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करणार — महापालिका आयुक्त

भिवंडी , प्रतिनिधी :  शहरात पावसाळा सुरू होण्यापूर्वी जी काही महत्वाची कामे करावयाची आहेत ती तातडीने हाती घेण्यात येतील. पावसाळ्यात इमारती पडून कोणत्याही प्रकारे दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासन सतर्कता घेणार  आहे.  राज्य शासनाच्या 5 नोव्हेम्बर 2015 च्या परिपत्रकानुसार धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये C-1 , C-2A, C2-B व C-3, इमारतींचे वर्गीकरण करणार. यातील सर्वात महत्त्वाचे ... Read More »

लालूप्रसादांना एम्स रुग्णालयात दाखल करणार

रांची: राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना उपचारांसाठी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेल्या लालूप्रसाद यांना सध्या प्रकृती बिघडल्यामुळे रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना चांगले उपचार मिळावेत यासाठी रिम्सच्या वैद्यकीय मंडळाने दिल्लीस्थित एम्स अथवा अन्य मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली होती. त्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे. लालूप्रसाद ... Read More »

अस्मितादर्श’कार डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन

औरंगाबाद : गेली पन्नास वर्षे अस्मितादर्श हे त्रैमासिक अखंडितपणे चालवून प्रत्येक अंक संग्राह्य राहील असाच काढण्याचं आणि दलित साहित्यिकांची एक पिढी निर्माण करण्यात ज्यांचा सर्वाधिक वाटा आह, अशा साहित्यिक, विचारवंत,लेखक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे रात्री दोन वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्याच महिन्यात  त्यांना पदमश्री  सन्मानपूर्वक देऊन गौरविण्यात आले होते.डॉ. गंगाधर पानतावणे यांनी ... Read More »

राज्यात प्रत्येक वर्षी एक लाख ९० हजार क्षयरुग्णांची नोंद

मुंबई ज्या वेगवेगळ्या व्याधींमुळे वैयक्तिक व सामाजिक क्रयशक्तीवर परिणाम होतो, त्यात क्षयरोगाचा (टीबी) क्रमांक वरचा असून, राज्यात प्रत्येक वर्षी साधारणपणे एक लाख ९० हजार क्षयरुग्णांची नोंद होते. यापूर्वी केवळ सार्वजनिक रुग्णालयांमधून ही नोंद ठेवली जात होती, आता मात्र खासगी आरोग्य यंत्रणांकडूनही या रुग्णांची माहिती मिळवण्यास क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाला यश आले आहे. नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या क्षयरोग नियंत्रण परिषदेमध्ये पंतप्रधानांनी ... Read More »

डॉक्टर उपलब्ध झाला नाही, गरोदर महिलेचा मृत्यू

मुंबई : जे.जे. रुग्णालयातं डॉक्टरांची सुमारे तासभर वाट पाहूनही कोणी डॉक्टर उपलब्ध झाला नाही आणि एका गर्भवती महिलेला तिच्या पोटातल्या बाळासह मृत्यूने कवटाळले. जळगाववरून या महिलेला उपचारांसाठी जेजेत आणण्यात आलं होतं. शनिवारी सकाळी ही घटना घडली. रुग्णालयात व्हेंटिलेटर्सचा तुटवडा होता आणि आयसीयुतले बेडही रिकामे नव्हते, अशी कारणं ड्युटीवर असणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहेत. वैशाली निकम असं या दुर्दैवी महिलेचं नाव ... Read More »

‘चला चिमणी वाचवू या…’

१) चिमणीसाठी तयार घरटे लावू शकता. २) दारात, फ्लॅट, घराच्या टेरेसवर, खिडकीत चिमण्यांसाठी धान्य, चपातीचे तुकडे आणि पिण्यासाठी पाणी ठेवा. ३) चिमण्यांना पाण्यात खेळायला खूप आवडते. त्यामुळे मातीचे मोठे भांडी, घरातले खराब भांड्यामध्येही पाणी ठेवू शकता. ४) रिकामी खोकी किंवा तत्सम वस्तू चिमण्या आत जाईल, असे भोक पाडून, घराबाहेर खिडकीच्यावर उंच जागेवर टांगता येईल. Read More »

राज्यात टप्प्याटप्प्याने प्लास्टिक बंदी

मुंबई: अखेर संपूर्ण राज्यात टप्प्याटप्प्याने प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तशी घोषणाच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत केली. त्यामुळे यापुढे राज्यात प्लास्टिकच्या पिशव्या, ताटं, चमचे आणि टोप्या विकता येणार नसून प्लास्टिक विक्रीप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. प्लास्टिक बंदीबाबतच्या विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना रामदास कदम यांनी ही घोषणा केली. राज्यात टप्प्याटप्प्याने प्लास्टिक बंदी करण्यात ... Read More »

दीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलच्या डॉक्टरावर गुन्हा दाखल

पुणे- पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (अायसीयू) डाॅक्टरसमाेरच महिला रुग्णावर मांत्रिकाने उपचार केल्याप्रकरणी डॉक्टर आणि मांत्रिकावर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अायसीयूतील मांत्रिकाचा हळदी, कुंकू, गुलाब उताऱ्याचा व्हिडिअाे व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधार्थ त्यांच्या रुग्णालयात आणि घरी गेले होते. परंतू आरोपी त्या ठिकाणी मिळाले नाहीत. त्यांनतर पोलिसांनी ... Read More »

दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात डॉक्टरानेच मांत्रिकाला बोलवून तंत्र-मंत्र केल्याची धक्कादायक घटना

आयसीयू’मधील रूग्णावर मांत्रिकाकडून उपचार, महिलेचा मृत्यू पुणे- पुण्यातील प्रसिद्ध अशा दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात ‘आयसीयू’ मध्ये उपचार सुरू असलेल्या महिलेला फरक पडावा म्हणून डॉक्टरानेच एका मांत्रिकाला बोलवून तिच्यावर तंत्र-मंत्र केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसापूर्वीची ही घटना असून, या तंत्र-मंत्र केल्यानंतर महिलेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. संध्याा सोनवणे (वय 24, दत्तवाडी) असे या महिलेचे नाव आहे तर, मांत्रिकाला बोलवून ... Read More »

प्रश्न सुटला नाही म्हणून बारावीतील मुलाची आत्महत्या

परीक्षेत ९ गुणांचा प्रश्न सुटला म्हणून मोहालीमधील करणवीर सिंह या बारावीच्या विद्यार्थ्यांने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. भौतिकशास्त्राचा पेपर संपल्यानंतर बुधवारी त्यानं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘तुमच्या इच्छा, तुमची स्वप्नं मी पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे मला माफ करा’ अशी सुसाईड नोटही त्याच्याजवळ कुटुंबियांना सापडली आहे. करणवीर हा हुशार विद्यार्थी होता. पूर्व परीक्षेत त्याला ९०% गुण ... Read More »