Friday , 15 December 2017
Breaking News
Home » बातम्या » आर्थिक

आर्थिक

जीएसटीआधीच्या जुन्या स्टॉकचा महासेल लवकरच

नवी दिल्ली – जीएसटी लागू होणार होता त्याआधी कपडे, अन्य वस्तूंचा जुना स्टॉक काढून टाकण्याची व्यापाऱ्यांची लगबग सुरू होती. हीच लगबग आता वर्षअखेरीस सुरू होण्याची दाट शक्यता आहे. ग्राहकांची यामुळे चांदी होणार आहे. दोन कारणांमुळे जुना स्टॉक काढून टाकणे व्यापाऱ्यांना भाग आहे. एकतर जुन्या करप्रणालीत घेतलेला विनाबिलाचा माल जीएसटी लागू झाल्याच्या ६ महिन्यांच्या आत विकला तरच व्यापाऱ्यांना त्यावर इनपुट टॅक्स ... Read More »

तुमचे बँकेतले पैसे पूर्णपणे सुरक्षित, FRDI वर अरुण जेटलींचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातून काही मेसेज व्हायरल होत आहेत. या मेसेजमधून मोदी सरकार एक नवं विधेयक आणण्याच्या तयारीत आहे, ज्यातून तुमचे बँक खात्यात जमा असलेले पैसे बुडण्याची शक्यता आहे, असा दावा केला जात आहे. पण यावरुन अर्थमंत्री अरुण जेटलींनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘बँकेत जमा असलेले खातेदारांचे सर्व पैसे सुरक्षित आहेत,’असं अरुण जेटलींनी सांगितलं आहे. जेटली म्हणाले ... Read More »

2020 नंतर देशात BS-IV गाड्यांवर बंदी, केंद्र सरकारने मागवली मतं

नवी दिल्ली – जे लोक नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत आहेत, त्यांच्यासाठी केंद्र सरकार एक धक्का देणारा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कारण, 2020 पूर्वी तयार झालेल्या BS-IV मानकांच्या वाहनांचं रजिस्ट्रेशन बंद करुन, ही वाहनं मोडित काढण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्र सरकार या वाहनांच्या रजिस्ट्रेशनची कालमर्यादा 30 जून 2020 पर्यंत निश्चित करणार आहे. त्यासाठी सरकार लवकरच मोटर वाहन नियमात बदल ... Read More »

बँकेचा व्यवहार फक्त कार्डने, चेकबुक लवकरच इतिहासजमा?

नवी दिल्ली – डिजिटल इंडियाचा नारा देणारं मोदी सरकार लवकरच चेकबुकला इतिहासजमा करणार असल्याची माहिती आहे. कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेचे सचिव प्रवीण खंडेलवाल यांनी यासंदर्भात भाकीत वर्तवलंय. डिजिटल व्यवहार जास्तीत जास्त वाढवण्यासाठी केंद्र सरकार चेकबुकच्या माध्यमातून होणारे व्यवहार रद्द करण्याचा गांभिर्याने विचार करत आहे. ही शक्यता प्रत्यक्षात आणली गेली तर नोटाबंदीनंतरचा तो सर्वात मोठा निर्णय असेल. दरम्यान, ... Read More »

गुंतवणूकदारांचे पैसे बुडवायला मी विजय मल्ल्या नाही- डीएसके

पुणे – ठेवीदारांचे पैसे थकवल्यामुळे अडचणीत आलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन गुंतवणूकदारांना आश्वस्त केले. मी विजय मल्ल्याप्रमाणे गुंतवणुकदारांचे पैसे घेऊन परदेशात पळून गेलेलो नाही. मात्र, मी एकाही गुंतवणूकदारांचे पैसे ठेवणार नाही. सर्वांना पैसे परत करेन, असे आश्वासन यावेळी डीएसकेंनी दिले. गेल्या काही दिवसांत डीएसके समूहाविषयी प्रसारमाध्यमांवर आणि सोशल मीडियावर अनेक बातम्या फिरत आहेत. अशा नकारात्मक ... Read More »

नोटाबंदीचा निर्णय योग्य, पण अंमलबजावणी चुकीची

नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांची टीका नवी दिल्ली – मोदी सरकारने गेल्या वर्षी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय योग्यच होता पण त्याची अंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आली अशी टीका यंदाचे नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांनी केली आहे. ते म्हणाले की, जास्त मूल्याच्या नोटा चलनातून बाद करणे ही संकल्पना योग्य होती पण सरकारने ती राबवताना अनेक चुका केल्या. सरकारने एकीकडे ... Read More »

‘विरोधकांना आत्मचिंतनाची गरज;’ मूडीजच्या अहवालानंतर जेटलींचा टोला

नवी दिल्ली – मूडीज या आर्थिक विश्वातील जगविख्यात संस्थेने भारताच्या मानांकनात सुधारणा केल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटलींनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ‘नोटाबंदीच्या निर्णयावर आणि जीएसटीच्या अंमलबजावणीवर टीका करणाऱ्या विरोधकांनी आत्मपरिक्षण करावे,’ असा टोला जेटलींनी लगावला. ‘भारताच्या आर्थिक परिस्थितीविषयी अनेकांना साशंकता होती. अर्थव्यवस्थेतील सुधारणांच्या प्रक्रियेबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न होते. त्यांनी आता गांभीर्याने आत्मचिंतन करण्याची गरज आहे,’ अशा शब्दांमध्ये जेटलींनी विरोधकांच्या टीकेचा समाचार ... Read More »

विजय मल्ल्यासाठी गेस्ट हाऊस देण्यास राज्य सरकारची तयारी!

मुंबई – महाराष्ट्र सरकार पळपुट्या विजय मल्ल्यासाठी गेस्ट हाऊस अर्थात विश्रामगृह देण्याच्या तयारीत आहे. अर्थात हे मल्ल्याच्या सोईसाठी नाही, तर केंद्र सरकारला मदत आणि ब्रिटीश कोर्टाला दाखवण्यासाठी आहे. सरकारी विश्रामगृह जेलमध्ये बदलण्यास तयार आहोत, असं महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला सांगितलं आहे. भारतातील जेल खराब, अस्वच्छ आहेत, असा युक्तीवाद मल्ल्याच्या वकिलांनी ब्रिटीश कोर्टात केला होता. त्याला खोडून काढण्यासाठी आणि मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ... Read More »

१७७ वस्तूंवरील जीएसटी २८ वरून १८ टक्क्यांवर

गुवाहाटी (आसाम) – केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आसाम येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटी कररचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. त्यानुसार दैनंदिन वापरातील १७७ वस्तूंवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के करण्यात आला आहे. तर ५० वस्तूंवरील २८ टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी जीएसटी परिषदेने १०० हून ... Read More »

जगात वेगाने घोडदौड करणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – भारतीय अर्थव्यवस्था वेगाने घोडदौड करत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वर्ल्ड फूड इंडिया २०१७ च्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. वस्तू आणि सेवा करामुळे वेगवेगळे कर बाद झाले आहेत. त्यामुळे करव्यवस्था अतिशय सोपी आणि सुटसुटीत झाली आहे, असेदेखील मोदींनी म्हटले. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने वर्ल्ड फूड इंडिया २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘खाद्य पदार्थांच्या ... Read More »