Friday , 15 December 2017
Breaking News
Home » बातम्या » खेळ

खेळ

भारतीय बुकी अॅशेस कसोटी फिक्स करणार होते

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यानच्या प्रतिष्ठीत अॅशेस मालिकेवरही फिक्सिंगचे आरोप लागले आहेत. दोन भारतीय बुकी अॅशेस मालिकेतील तिसरी कसोटी फिक्स करण्यासाठी आले होते, असा दावा इंग्लंडच्या एका वृत्तपत्राने केला आहे. पर्थ स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान अॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामाना सुरू असतानाच या वृत्तपत्राने केलेल्या दाव्यामुळे क्रिकेट जगत हादरून गेलं आहे. ‘द सन’ या वृत्तपत्राने हा दावा ... Read More »

गौतम गंभीरला झटका, हायकोर्टाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली – टीम इंडियाचा क्रिकेटपटू गौतम गंभीरची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. एका रेस्टोरंट-बारने त्यांच्या पबच्या जाहिरातीसाठी गौतम गंभीर हे नाव वापरलं होतं, ते हटवण्याची मागणी गंभीरने याचिकेद्वारे केली होती. मात्र कोर्टाने त्याला नकार दिला. त्याचं कारण म्हणजे त्या पबच्या मालकाचं नावही गौतम गंभीरच आहे. त्यामुळे कोर्टाने ते नाव न वापरण्याची गंभीरची मागणी फेटाळली. काय आहे संपूर्ण प्रकरण? ... Read More »

मोहालीच्या मैदानात रोहितची कमाल, वनडे कारकिर्दीतील तिसरे द्विशतक

मोहाली – भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या आणि महत्त्वपूर्ण सामन्यात रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी केली. रोहितने कारकिर्दीतील तिसरे द्विशतक झळकावले. या सामन्यात रोहितने सुरुवातीला संयमी खेळी केली. मॅथ्यूजच्या पहिल्या षटकात त्याने एकही धाव घेतली नाही. मात्र, त्यानंतर त्याने मैदानात दमदार खेळ दाखवला. या सामन्यात रोहितने १५३ चेंडुत १३ चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीनं नाबाद २०८ ... Read More »

विराटची रँकिंगमध्येही झेप, दुसऱ्या स्थानी विराजमान!

मुंबई – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. विराटनं श्रीलंकेविरुद्धच्या दिल्ली कसोटीत 243 आणि 50 धावांची खेळी उभारली. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत त्यानं लागोपाठ दोन द्विशतकं ठोकली आणि 610 धावांचा रतीब घातला. भारतीय कर्णधाराला याच कामगिरीनं आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत दुसरं स्थान मिळवून दिलं. वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमधल्या ... Read More »

मेरी कोमने भारतीय बॉक्सिंग महासंघाचा पदभार सोडला

नवी दिल्ली – ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर एम.सी.मेरी कोम हिने भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निरीक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. कोणत्याही सक्रिय खेळाडू राष्ट्रीय स्तरावर निरीक्षक म्हणून कार्यरत राहता येणार नाही, असे क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर मेरी कोमने पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर मेरी कोम म्हणाली की, क्रीडामंत्र्यांशी चर्चा करुन राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मी या पदाची मागणी ... Read More »

पदक विजेत्या खेळाडूंना सरकारकडून गाय बक्षीस; मंत्र्यांकडून घोषणा

हरियाणा – आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा सरकारकडून रोख रक्कम, सरकारी नोकरी, जमीन अशी बक्षीसे दिली जातात. आता या यादीत गायीचे नाव देखील जोडावे लागणार आहे. हरयाणाचे पशुसंवर्धन मंत्री ओम प्रकाश धनकर यांनी युवा महिला चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणाऱ्या राज्याच्या खेळाडूंना गाय बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. हरियाणा बॉक्सिंग असोसिएशनचे प्रमुख असलेल्या धनकर यांनी रोहतकमध्ये ... Read More »

खेळाडूंना वाढीव मानधन मिळायला हवे – गांगुली

मुंबई – भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयच्या सल्लागार समितीचा अध्यक्ष सौरव गांगुलीने खेळाडूंच्या मानधनाच्या मुद्द्यावर विराट कोहलीची पाठराखण केली आहे. बीसीसीआयच्या नफ्यात खेळाडूंना हिस्सा मिळायला हवा, असे मत गांगुलीने व्यक्त केले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि धोनी यांनी केलेल्या वेतन वाढीची शिफारस बीसीसीआयच्या समितीने सोमवारी स्वीकारली आहे. गांगुलीने एका कार्यक्रमामध्ये खेळाडूंच्या मानधनामध्ये वाढ करणे गरजेचे असल्याचे म्हटले. जर ... Read More »

कोल्हापूरची अनुजा पाटील टीम इंडियाची कर्णधार

मुंबई – बांगलादेश ‘अ’ संघाबरोबर भारतात होणाऱ्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी भारतीय ‘अ’ संघाची धुरा मराठमोळ्या अनुजा पाटीलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. अनुजा पाटील ही मूळची कोल्हापूरची आहे. येत्या डिसेंबर महिन्यात कर्नाटक येथे बांग्लादेशच्या ‘अ’ महिला क्रिकेट संघासोबत भारतीय महिलांची ‘अ’ टीम भिडणार आहे. या मालिकेत 2 डिसेंबरपासून तीन एकदिवसीय सामने हुबळी येथे खेळले जाणार आहे. तर 12 डिसेंबरपासून ... Read More »

माजी विम्बल्डन चॅम्पियन जाना नोवोत्नाचे निधन

प्राग (चेक प्रजासत्ताक) – माजी विम्बल्डन चॅम्पियन जाना नोवोत्नाचे रविवारी निधन झाले. ती ४९ वर्षांची होती. झोपेतच तिची प्राणज्योत मालवली. जाना चेक रिपब्लिकची नागरिक होती. तिला दीर्घकाळापासून कर्करोगाने ग्रासले होते. तिने तिच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत १७ ग्रँड स्लॅम जिंकले. दुहेरी प्रकारात जानाच्या नावावर ७६ विजेतेपदे होती. तर एकेरी प्रकारात २४ विजेतेपदांवर जानाने नाव कोरले. १९८८ मध्ये तिला ऑलिम्पिकचे रौप्यपदक मिळाले. ... Read More »

अंधुक प्रकाशामुळे कोलकाता कसोटी अनिर्णित

कोलकाता – अंधुक प्रकाशाच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने कोलकाता कसोटीत आपला पराभव टाळला आहे. दुसऱ्या डावात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २३१ धावांचं आव्हान ठेवलं होतं. विराट कोहलीच्या शतकाच्या आधारावर भारताने दुसऱ्या डावात ३५२ धावांवर आपला डोव घोषित केला. कोहलीने दुसऱ्या डावात १०४ धावांची शतकी खेळी केली. अखेरच्या दिवशी श्रीलंकेला उरलेली दोन सत्र फलंदाजी करणं भाग होतं. त्यामुळे कोलकाता कसोटी रंगतदार अवस्थेत पोहचली. ... Read More »