Wednesday , 21 March 2018
Breaking News
Home » बातम्या » महिला

महिला

लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून दोघांनी केला विवाह

आंतरराष्ट्रीय महिला दिनी चेन्नईमध्ये हे दोघं ‘आत्मसन्मान विवाह’मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. धार्मिक रीती रिवाजांना फाटा देऊन होणारी अशी लग्न ‘आत्मसन्मान विवाह’ नावानं ओळखली जातात. पुरोगामी विचारांचे तामीळ नेते आणि विवेकवादी कास धरली चपेरियार यांनी ही परंपरा सुरू केली होती. सहा वर्षांपूर्वी प्रीतिशा आणि प्रेम यांची फेसबुकवर मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचं रूपांतर विवाहात झालं. तामिळनाडूतील तिरुनेलवेलीच्या कल्याणीपुरम गावात 1988 ... Read More »

नोकरी करणे राजपूतांच्या सन्मानाला शोभत नाही म्हणून सासऱ्याने तलवारीने सुनेचं मुंडक उडवलं

घरच्या सूनेने नोकरी करणे राजपूतांच्या शान, सन्मानाला शोभत नाही अशी विचारधारा बाळगणाऱ्या एका व्यक्तिने आपल्या सूनेचा शिरच्छेद केला. राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यात खातुशाम मंदिराजवळ गुरुवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. सदर महिला शहाजहापूर येथील फॅक्टरीमध्ये जात असताना आरोपीने तलवारीने महिलेचे मुंडके उडवले. भररस्त्यात या महिलेची हत्या झाली. पण कोणीही या महिलेच्या मदतीसाठी पुढे आले नाही. या महिलेचा जागीच मृत्यू झाला. उमा ... Read More »

दोन मुलं जन्माला घालण्याचे धोरण सक्तीचे करण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली…

नवी दिल्ली : दोन मुलं जन्माला घालण्याचे धोरण सक्तीचे करण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दोन मुलं जन्माला घालणं सक्तीचं करावं अशी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, पण आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली आहे.  एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, केवळ दोन अपत्य असलेल्यांनाच सरकारी सुविधांचा लाभ घेता येईल असं या याचिकेत म्हटलं होतं. मात्र, हे धोरणाशी संबंधीत ... Read More »

स्नेहलता श्रीवास्तव लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस

नवी दिल्ली – लोकसभेच्या सरचिटणीसपदी स्नेहलता श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्नेहलता या लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस ठरल्या आहेत. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शुक्रवारी श्रीवास्तव यांची सभागृहाला ओळख करुन दिली. स्नेहलता श्रीवास्तव यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत असेल. विद्यमान सरचिटणीस अनुप मिश्रा यांच्याकडून स्नेहलता श्रीवास्तव पदभार स्वीकारतील. यापूर्वी राज्यसभेत रमा देवी या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून कार्यरत ... Read More »

लग्नानंतर महिलेचा धर्म बदलत नाही – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली – लग्नानंतर पतीच्या धर्मामध्ये पत्नीचे धर्मांतर होत नाही आणि तिने पतीच्याच धर्माचे अनुकरण करावे अशी सक्ती करता येत नाही, असे सुप्रीम कोर्टाने गुरुवारी स्पष्ट केले. हिंदू पुरुषाशी लग्न करणाऱ्या पारसी महिलेला ‘टॉवर ऑफ सायलन्स’मध्ये प्रवेश देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने वलसाड झोराष्ट्रीयन ट्रस्टला केली आहे. गुलरोख गुप्ता यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. गुलरोख या ... Read More »

भारतीय महिलांचा व्यवस्थेविरोधात एल्गार!

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १२०व्या स्मृतिदिनी नागपूर येथे मनुवाद, ब्राह्मणवाद, हिंदुत्ववादाविरोधात भारतीय नारीची ललकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. फुले-आंबेडकरी महिला संघटनांसह डाव्या चळवळी व समाजवादी आंदोलनातील महिलांचा सहभाग या परिषदेच्या आयोजनात व उपस्थितीत असल्यामुळे या परिषदेचे नेमके आयोजन कोणी केले, हा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचप्रमाणे नागपूरला का आणि १० मार्च रोजीच का? हा प्रश्न देखील जाणकारांनी उपस्थित ... Read More »

क्रांतीज्योती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा आज स्मृतिदिन

मुंबई – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतिदिन. संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहिलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना मृत्यू देखील समाजाची सेवा करतानाच आला. १० मार्च १८९७ रोजी वयाच्या ६६व्या वर्षी त्यांचे प्लेग पीडितांची सेवा करताना प्लेगचा संसर्ग झाल्याने निधन झाले. लोकमततर्फे या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना भावपूर्ण श्रद्धांजली. सावित्रीबाई फुले (३ जानेवारी १८३१-१० मार्च १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या ... Read More »

महिला कर्मचाऱ्यांना मिळणार २६ आठवड्यांची प्रसूती रजा; लोकसभेत विधेयक मंजूर

नवी दिल्ली – महिला कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज आहे. त्यांना आता १२ ऐवजी २६ आठवड्यांची प्रसूती रजा मिळणार आहे. प्रसूती रजा विधेयकाला आज लोकसभेत आवाजी मतदानाने मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे ही रजा भरपगारी असणार आहे. देशभरातील जवळपास १८ लाख महिला कर्मचाऱ्यांना या विधेयकामुळे लाभ मिळणार आहे. मॅटर्निटी लिव्ह बिल म्हणजेच प्रसुती रजा सुधारित विधेयक याआधी राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. ... Read More »

भारतीय नारीची ललकार-विषमतावादाचा धिक्कार! उद्या नागपूर येथे राष्ट्रीय महिला मेळावा

नागपूर – नागपूर येथे १८ आणि १९ जुलै १९४२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महिला मुक्ती मेळावा घेण्यात आला होता, त्यात जवळपास ४० हजार महिलांची उपस्थिती होती. संपूर्ण भारतातून या मेळाव्याला महिला आल्या होत्या. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान एन. शिवराज यांनी भूषविले होते, तर या मेळाव्यासाठी त्यावेळच्या महिला नेत्या सुलोचनाताई डोंगरे, किर्तीबाई पाटील आणि इंदिराबाई पाटील यांनी विशेष मेहनत यासाठी ... Read More »