Friday , 15 December 2017
Breaking News
Home » बातम्या » राजकीय

राजकीय

‘१३०० शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट’

नागपूर – राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. या संबंधी आमदार कपिल पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्दयावर दोन वेळा गोंधळ होऊन सभागृह बंद पडले. शिक्षणासंदर्भातील सरकारचे धोरण किती दुटप्पी आणि उदासिन आहे हे लक्षात आले. राज्यातील १३०० च्यावर शाळा बंद करण्याचा डाव शिक्षणमंत्र्यांनी चालू केला आहे. ... Read More »

निवडणूक आयोग हे भाजपचे कळसूत्री बाहुले ; मोदींच्या रोड शोवर काँग्रेसचा घणाघात

नवी दिल्ली – साबरमतीमध्ये मतदान केल्यानंतर मिनी रोड शो करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातील कळसूत्री बाहुले असल्याची टीका काँग्रेसने केली. निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्यातील मतदानात गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. साबरमतीतील मतदान केंद्रातून बाहेर आल्यावर नरेंद्र ... Read More »

मुंबई महापालिका पोटनिवडणुकीत भाजप विजयी

मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेवर महापालिकेची पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार प्रतिभा योगेश गिरकर विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार निलम मधाळे यांचा ७६०७ मताधिक्यांनी पराभव केला. भाजपच्या नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांचं नुकतच निधन झालं होतं. त्या कांदिवलीच्या डहाणूकरवाडीतील वॉर्ड क्रमांक २१ च्या नगरसेविका होत्या. त्यांच्या ... Read More »

गैरव्यवहारप्रकरणी दोषींवर होणार कठोर कारवाई

पालघर – पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागात गैरव्यवहार करणाऱया दोषी अधिकारी व कर्मचाऱयांवर होणार कठोर कारवाई करणार असल्याचे महसूल मंत्र्यांनी जाहीर केले. विक्रमगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत करण्यांत येत असलेल्या रस्ते, छोटे पूल, मोऱ्या, इमारती आदी बांधकामांमध्ये होत असलेला विलंब व दुर्लक्ष यामुळे अपूर्ण राहिलेली कामे तसेच निकृष्ट दर्जाच्या वापरण्यात आलेल्या साहित्यामुळे सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाल्याची माहिती ... Read More »

अंबरनाथ पंचायतीत भाजपच्या हाती भोपळा

ठाणे – अंबरनाथ पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळविला आहे. पंचायत समितीच्या आठ पैकी सहा जागा शिवसेना- राष्ट्रवादीने जिंकल्या असून या निवडणुकीत भाजपला खातंही खोलंता आलं नाही. भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला शह देण्यासाठी अंबरनाथ पंचायत समितीत राष्ट्रवादी सोबत आघाडी केली होती. या आघाडीचा स्विकार करत मतदारांनी भाजपला सपशेल नाकारले. या ... Read More »

आमच्यासारखं तुम्हालाही लोक घरी पाठवतील : अजित पवार

नागपूर – भाजपमध्ये आलेले लोकही नाराज होऊन पक्ष सोडून चालले आहेत. काही तरी निर्णय घ्या, नाहीतर भाजपमध्ये केवळ जुने संघवालेच शिल्लक राहतील, अशी टोलेबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. त्याचप्रमाणे तीन वर्षांपूर्वी जसे लोकांनी आम्हाला घरी पाठवले होते, तसे ते आता तुम्हाला घरी पाठवतील, असा उपरोधिक सल्ला अजित पवार यांनी दिला. सरकारवर जोरदार टीका करताना कर्जमाफीबरोबरच ... Read More »

राहुल गांधींच्या मुलाखतीने आचारसंहिता भंग, निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज विविध वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीवरुन निवडणूक आयोगानं कारवाईचा इशारा दिला आहे. राहुल गांधी यांची मुलाखत दाखवण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या मुलाखती हा आचारसंहितेचा भंग असून ही मुलाखत दाखवणाऱ्या वाहिन्यांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधींना 18 डिसेंबरच्या पाच वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले ... Read More »

आयएनएस ‘कलवरी’ नौदलात दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

मुंबई – ‘आयएनएस कलवरी’ या पाणबुडीचे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. १५ वर्षांनंतर नौदलाच्या ताफ्यात नवीन पाणबुडी दाखल झाली असून आयएनएस कलवरीसोबत एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलवरी पाणबुडीचे लोकार्पण केले. नौदलाच्या ताफ्यातून काही पाणबुड्या निवृत्त झाल्या तर काहींचे आयुष्यमान संपल्याने त्यांची जराजर्जर अवस्था होती. या पार्श्वभूमीवर १५ वर्षानंतर भारतीय नौदलात ... Read More »

सेटवरील लैंगिक शोषण रोखण्यासाठी कायदा करा; मेनका गांधींचे बॉलिवूड निर्मात्यांना पत्र

नवी दिल्ली – चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषणाच्या प्रकारांना आळा बसावा, यासाठी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी पुढाकार घेत आघाडीच्या बॉलिवूड निर्मात्यांशी पत्र लिहून संवाद साधला आहे. देशातील सर्व निर्मात्यांनी कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक विरोधी कायदा २०१३ कायद्याचे पालन करावे, असे मेनका गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच मेनका गांधी यांनी पत्रामध्ये लैंगिक शोषणाची व्याख्याही स्पष्ट केली आहे. ... Read More »

गुजरातमध्ये परिवर्तनाची सुरुवात – राहुल गांधी

अहमदाबाद – गुजरातमधील अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. गुजरातमध्ये परिवर्तनाला सुरुवात झाली असून गुजरातच्या भविष्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे त्यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन मतदारांना आवाहन ... Read More »