Saturday , 21 July 2018
Breaking News
Home » बातम्या » रोजगार-स्वयंरोजगार

रोजगार-स्वयंरोजगार

घटनापीठाकडून अंतिम निर्णय येईपर्यंत केंद्र सरकार बढतीत आरक्षण लागू करु शकते-सर्वोच्च न्यायालय

  नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांना बढती देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, विविध हायकोर्टाच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची बढती थांबली असल्याचा मुद्दा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात उपस्थित केला. बढतीतील आरक्षणाच्याबाबत अंतिम निकाल येईपर्यंत केंद्र सरकार कायद्यातंर्गत एसी/एसटी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना आरक्षणानुसार बढती देऊ शकते असे निर्देश दिले. बढतीमधील आरक्षणाच्या वादावर सुप्रीम कोर्टाने मंगळवारी महत्त्वाचे निर्देश दिले. बढतीतील आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून अंतिम निर्णय ... Read More »

आयटी कंपन्यांच्या निकषांनुसार ९४ टक्के आयटी पदवीधर अयोग्यतेचे – टेक महिंद्राचे सीईओ सी.पी. गुरनानी

नवी दिल्ली: भारतातील ९४ टक्के आयटी पदवीधर मोठ्या आयटी कंपनीत काम करण्याच्या योग्यतेचे नसल्याचे टेक महिंद्राचे सीईओ सी.पी. गुरनानी यांनी म्हटले. नव्या तंत्रज्ञानामुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत असल्याकडे गुरनानी यांनी लक्ष वेधले. मनुष्यबळ कौशल्य, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा आदींसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्याबाबतीत भारतीय कंपन्यांसमोर मोठे आव्हान आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेता नोकरी देताना मोठ्या आयटी कंपन्यांच्या निकषांनुसार ९४ ... Read More »

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन !

वाशिम – विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सेवा देणाऱ्या कंत्राटी अधिकारी-कर्मचारी संघटनांनी ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील कर्मचारीही सहभागी झाले. विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सेवा देणाऱ्या कंत्राटी अधिकारी-कर्मचारी संघटनांनी ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील कर्मचारीही सहभागी झाले असून, यामुळे ... Read More »

कोकणात शिक्षक भरतीत स्थानिकांना आरक्षण द्या – आ.निरंजन डावखरे

ठाणे :  प्रतिनिधी   कोकणातील शिक्षक भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना 70 टक्के आरक्षण द्यावे, असा आग्रह कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे धरला आहे.आमदार डावखरे यांनी शिक्षण मंत्री तावडे यांची मंत्रालयात काल मंगळवारी भेट घेऊन निवेदन दिले.  शिक्षकांच्या भरतीत 2010 पूर्वी स्थानिकांना आरक्षण होते. त्यामुळे स्थानिक तरुण-तरुणींना नोकरी मिळत असे. विशेषतः ते जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असल्यामुळे परजिल्ह्यात बदलीसाठी प्रयत्न करीत नसत. ... Read More »

लालबागमधील दुकानदारांचे सरकारच्या निषेधार्थ आंदोलन

मुंबई : सरकारकडून दुकानांच्या भाड्यामध्ये दहापट वाढ करून दुकानदारांना हुसकावून जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. लालबाग येथील जाम मिल बिल्डिंगमधील दुकानांना जास्त भाडे आकारून त्यांचे जिणे नकोसे केले आणि आता तर त्यांना हुसकावून लावण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. दुकानदारांनी योग्य भाडे देण्याचे कधीही नाकारले नव्हते, पण एन.टी.सी.ने भाडे स्वीकारणे बंद केले आणि दुकानदारांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. 31 मार्च ... Read More »

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जि.प.वर छत्री माेर्चा

जळगाव – राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन दुप्पट वाढ करून देताना त्यांच्या निवृत्तीची वयाेमर्यादा मात्र पाच वर्षांनी कमी केली अाहे. ही मर्यादा पूर्ववत ठेवण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेवर छत्री माेर्चा काढला. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेप्रमाणे मानधन वाढ व भाऊबीज दुप्पट देण्याचा शासकीय निर्णय घेण्यात अाला. हा निर्णय घेतांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षावरून ६० वर्षे करण्यात ... Read More »

मुंबई महापालिका तरुण उद्योजकांसाठी सुरु करणार ‘स्टार्ट अप हब’

मुंबई – मुंबई महानगरपालिका तरुण उद्योजकांसाठी ‘स्टार्ट अप हब’ सुरु करणार आहे. नाविण्यपूर्ण कल्पना घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करु पाहणाऱ्यांसाठी हे ‘स्टार्ट अप हब’ उभारले जाणार आहे. अंधेरीत उभारल्या जाणाऱ्या या हबच्या माध्यमातून शहर नियोजनाच्या समस्यादेखील सोडवण्यात येणार आहेत. शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘स्टार्ट अप हब’ची उभारणी होणार आहे. यासाठी आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पालिका आयुक्त ... Read More »

न्यूझीलंडमध्येही नोकरीत ‘किव्हीज फर्स्ट’; परदेशी कामगारांवर संकट

न्यूझीलंड – अमेरिका आणि ऑस्ट्रेलियापाठोपाठ आता न्यूझीलंडमध्येही परदेशी कामगारांच्या रोजगारावर संकट आले आहे. न्यूझीलंडमधील नोकऱ्यांमध्येही स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी’किवीज फर्स्ट’ असा नाराच या देशाने दिला आहे. परदेशी कामगारांचे प्रमाण कमी करण्यासाठी न्यूझीलंडने हा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचे इमिग्रेशन मंत्री मिशेल वूडहाउस यांनी गुरुवारी सरकारी धोरणाची माहिती दिली. ‘आपल्या देशातील कंपन्या बाहेरच्या देशांमधील कामगारांवर अवलंबून आहेत. पण आता परदेशी तरुणांना नोकरी देणे ... Read More »

अनुकंपावरील नोकरीच्या नियमात महत्वपूर्ण बदल, लग्नानंतरही नोकरीची संधी

नवी दिल्ली – केंद्र सरकारने अनुकंपावर आधारित नोकरी देण्याच्या नियमात मोठा बदल केल्यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचे अकाली निधन झाले किंवा वैद्यकीय कारणामुळे ५५ पेक्षा कमी वय असताना निवृत्त झाल्यास अशावेळी त्यांच्या जागेवर घरातील एकाला नोकरी देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत केवळ पत्नी किंवा अविवाहित मुलगा-मुलगी यांनाच नोकरी मिळत. परंतु नव्या बदलानुसार आता विवाहित मुलालाही नोकरी मिळू शकते. कार्मिक ... Read More »