Saturday , 21 July 2018
Breaking News
Home » बातम्या » शैक्षणिक

शैक्षणिक

सम्यक विद्यार्थी आंदोलन

सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा सांगली दि. 05 जुन 2018 रोजी मु.पो चरण ता शिराळा येथे सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती. शिक्षण व्यवस्थाचे बाजारीकरण; शिक्षणाचं महत्व व सद्याचे भाजप सरकारचे विद्यार्थी विरोधातील धोरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौध्द महासभेचे उप अध्यक्ष अमित वेटम हे होते. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अमोल ... Read More »

आयटी कंपन्यांच्या निकषांनुसार ९४ टक्के आयटी पदवीधर अयोग्यतेचे – टेक महिंद्राचे सीईओ सी.पी. गुरनानी

नवी दिल्ली: भारतातील ९४ टक्के आयटी पदवीधर मोठ्या आयटी कंपनीत काम करण्याच्या योग्यतेचे नसल्याचे टेक महिंद्राचे सीईओ सी.पी. गुरनानी यांनी म्हटले. नव्या तंत्रज्ञानामुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत असल्याकडे गुरनानी यांनी लक्ष वेधले. मनुष्यबळ कौशल्य, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा आदींसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्याबाबतीत भारतीय कंपन्यांसमोर मोठे आव्हान आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेता नोकरी देताना मोठ्या आयटी कंपन्यांच्या निकषांनुसार ९४ ... Read More »

NEET परीक्षेत कल्पना कुमारी ऑल इंडिया रँकमध्ये पहिली, ७२० पैकी ६९१ गुण

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट परिक्षेच्या निकालाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यानंतर अखेर सोमवारी (४ जून) सीबीएससीकडून निकाल जाहीर करण्यात आला. उमेदवारांना आपला निकाल cbseneet.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. देशभरातील विविध केंद्रांवर ७ मे रोजी NEET 2018 परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत ७२० पैकी ६९१ गुण मिळवत कल्पना कुमारी ही ऑल इंडिया रँकमध्ये पहिली आली आहे. तिला ९९.९९ ... Read More »

बारावीचा निकाल ८८.४१ टक्के, कोकण विभागाचा निकाल राज्यात सर्वाधिक ९४.८५ टक्के

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे. एकूण १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यात कोकण विभागाचा निकाल ९४.८५ टक्के एवढा सर्वाधिक लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८६.१३ टक्के लागला आहे. या निकालात देखील मुलींनी बाजी मारली ... Read More »

बालपणाचा आनंद पूर्णपणे लुटू द्या, होमवर्क देऊ नका-मद्रास उच्च न्यायालयाचे आदेश

चेन्नई: मुलांना बालपणाचा आनंद पूर्णपणे लुटू द्या. तो त्यांचा अधिकारच आहे. त्यांना कोणताही ताण देऊ नका. इयत्ता दुसरीपर्यंत मुलांना होमवर्क देऊ नका, असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने केंद्राला दिले. सीबीएसई शाळांमध्ये एनसीईआरटी अभ्यासक्रम सुरू करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. मुले ‘वेट लिफ्टर’ नाहीत. त्यांची दफ्तरे मालवाहतूक करणारे कंटेनर नाहीत. मुलांवर शिक्षणाचं ओझं लादू नका, असं न्यायालयानं एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान म्हटलं. उच्च ... Read More »

सीबीएसई 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या संध्याकाळी 4 वाजता

नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(सीबीएसई) 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या संध्याकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे. सीबीएसईचा दहावीचा निकाल cbse.nic.in या वेबसाइटरवर पहिल्यांदा जाहीर करण्यात येणार असल्याचीही माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एका अधिका-यानं दिली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयातील शिक्षा सचिव अनिल स्वरूप यांनी ट्विरवरून याची माहिती दिली आहे. दहावीचा निकाल उद्या संध्याकाळी 4 वाजता लागणार आहे. सीबीएसई 10वीचा निकाल  cbseresults.nic.in ... Read More »

आयसीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल ९८.५१ टक्के तर बारावीचा ९६.२१ टक्के

काऊन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (आयसीएसई) कडून घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून मुंबईने बाजी मारली आहे. १० वीचा निकाल ९८.५ टक्के तर १२ वीचा निकाल ९६.२१ टक्के लागल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. मुंबईतील स्वयम दास हा दहावीचा विद्यार्थी ९९.४ टक्के मिळवत देशात पहिला आला आहे. तर १२ वीच्या परीक्षेत एकूण ७ ... Read More »

भाजपाच्या सामाजिक अन्यायाचा पराभव करा -दिल्ली विद्यापीठातील शिक्षकांचे कर्नाटकातील मतदारांना आवाहन

नवी दिल्ली- कर्नाटकात उद्या १२ मे रोजी विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्यासाठी प्रचारही काल संध्याकाळी थांबवण्यात आला. मात्र दिल्ली विद्यापीठातील काही शिक्षकांनी केलेल्या आवाहनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. दिल्लीपासून शेकडो किमी दूर असणाऱ्या कर्नाटकातील मतदारांना त्यांनी भाजपाला मतदान करु नका असे आवाहन केले आहे.  केंद्रातील भाजपा सरकारने अनुसुचित जाती, जमातींच्या प्रतिनिधींच्या नेमणुका रोखण्यासाठी, शिक्षणाचे खासगीकरण करण्यासाठी आणि प्रिव्हेन्शन ऑफ ... Read More »

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव

 मुंबई : विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिवसेनेच्या युवासेनेनं एक हाती विजय मिळवत भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव केला आहे. 10 पैकी 10 जागांवर युवासेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. 2010 साली देखील युवासेनेनं ही निवडणूक जिंकली होती. यंदा युवासेनेसमोर अभाविप आणि काँग्रेसप्रणित एनएसयूआयच्या उमेदवारांचं तगडं आव्हान होतं. पण युवासेनेनं जोरदार मुसंडी मारत या निवडणुकीत एक हाती विजय मिळवला. दरम्यान, 25 मार्चला ... Read More »

परीक्षा संपताच सुट्टी सुरू, राज्य सरकारचा तो’ निर्णय मागे

मुंबई : राज्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा 30 एप्रिलपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना आता उन्हाळी सुट्ट्यांचं प्लॅनिंग करता येणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवावे, असा आदेश राज्य विद्या प्राधिकरणाने काढला होता. या आदेशामुळे अनेक शाळांतून नाराजीचा सूर उमटला होता. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री ... Read More »