Breaking News
Home » बातम्या » शैक्षणिक (page 3)

शैक्षणिक

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव

 मुंबई : विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिवसेनेच्या युवासेनेनं एक हाती विजय मिळवत भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव केला आहे. 10 पैकी 10 जागांवर युवासेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. 2010 साली देखील युवासेनेनं ही निवडणूक जिंकली होती. यंदा युवासेनेसमोर अभाविप आणि काँग्रेसप्रणित एनएसयूआयच्या उमेदवारांचं तगडं आव्हान होतं. पण युवासेनेनं जोरदार मुसंडी मारत या निवडणुकीत एक हाती विजय मिळवला. दरम्यान, 25 मार्चला ... Read More »

परीक्षा संपताच सुट्टी सुरू, राज्य सरकारचा तो’ निर्णय मागे

मुंबई : राज्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा 30 एप्रिलपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना आता उन्हाळी सुट्ट्यांचं प्लॅनिंग करता येणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवावे, असा आदेश राज्य विद्या प्राधिकरणाने काढला होता. या आदेशामुळे अनेक शाळांतून नाराजीचा सूर उमटला होता. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री ... Read More »

संघाचे समर्थक असल्याचा आरोप सराटेंवर औरंगाबादमध्ये क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची शाईफेक

औरंगाबाद मराठा समाजाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेण्याचे काम सुरु आहे. यासाठी राज्यातील मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. एम. जी. गायकवाड हे सध्या औरंगाबादमध्ये आहेत. शुक्रवारी सुभेदारी सभागृहात ते समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत होते. यादरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचे काही कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना गाठले आणि त्यांच्यावर शाई फेकली. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी ... Read More »

ओबीसी समाजाने आर्थिकदृष्ट्या जागृत होणे गरजेचे -प्रा.श्रावण देवरे

ओबीसींनी संघटित होत जनगणनेसाठी दबाव आणावा!-माजी आमदार माळी धुळ्यात पार पडली राज्यस्तरीय ओबीसी जनगणना परिषद धुळे,दि.11 : एकिकडे ओबीसींमधील कष्टकरी वर्ग सरकारी तिजोरी  भरत असतांना दुसरीकडे उच्चजातीयराज्यकर्ते मात्र लूट करीत आहेत़. राजकीयदृष्ट्या जागृत असलेला ओबीसी समाज सामाजिक व आर्थिकदृष्ट्या जागृत नाही. जोपर्यंत समाज जागृत होत नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही. राज्यात ओबीसी समाजाचे केवळ तीन मोर्चे निघाले. त्यानंतर लगेच ... Read More »

शाळकरी मुलांवर मधमाशांचा हल्ला; 8 जण जखमी

पुणे-शंकरराव बुट्टे पाटील इंग्रजी माध्यम शाळेतील 22 विद्यार्थी आग्या मोहळातील माशांनी हल्ला केल्याने जखमी झाले आहेत. त्यातील आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाळा सुटल्यानंतर शाळेच्या संरक्षक भिंतीबाहेर असलेल्या शहर पाणीपुरवठ्याच्या शंभर फूट उंचीच्या पाण्याच्या टाकीवरील आग्या मोहळातील माशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढविला. माशांच्या हल्ल्यामुळे विद्यार्थी सैरावरा पळत सुटले. शाळेच्या परिसरात असलेल्या अशा धोकादायक आग्या मोहळांना काढून टाकण्यासाठी नगरपालिकेने तत्परतेने लक्ष ... Read More »

एमपीएससीच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती

मुंबई – मागास वर्गातील उमेदवारांना नियमबाह्य पद्धतीनं अपात्र ठरविण्याच्या निर्णयावरून राज्य सरकारला फटकारत मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रवेश प्रक्रियेला अंतरिम स्थगिती दिली आहे. आरक्षण प्रवर्गांतील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून अर्ज केल्यास अपात्र ठरवले जात असल्याचा आरोप करत अजय मुंडे यांनी जनहित याचिका केली आहे. त्यावरील प्राथमिक सुनावणीत न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठाने राज्य ... Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सुविधा देणार!

नागपूर – यवतमाळ जिल्ह्य़ासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिले. रामहरी रूपनंवर यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना तावडे म्हणाले. राज्यात एकूण एक लाख ८७ हजार ७१३ इतक्या शाळा असून ९८.५० टक्के शाळांमध्ये ... Read More »

ज्यु.कॉलेजमध्ये बायोमेट्रिक हजेरी, खासगी क्लासवर नियंत्रण

नागपूर – खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली. शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी खाजगी शिकवण्यांवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा आणण्याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर विनोद तावडे यांनी उत्तर दिलं. खासगी शिकवणी वर्गावर नियंत्रण आणणारा कायदा तयार करण्याच्या दृष्टीने, विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या ... Read More »

आता बीएमसीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना जर्मनीत फुटबॉल प्रशिक्षण

मुंबई – जर्मनी आणि भारत यांच्यात फुटबॉलच्या बाबतीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. भारतात अफाट गुणवत्ता असली तरी त्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण, पायाभूत सोयीसुविधा आणि फुटबॉलच्या अचूक अभ्यासक्रमाची नितांत आवश्यकता आहे. हा फरक भरुन काढण्यासाठी आता जर्मनीचा फुटबॉल अभ्यासक्रम भारतात राबवला जाणार आहे. अशाप्रकारचा हा उपक्रम भारतात पहिल्यांदाच राबविला जात आहे. ‘रोड टू जर्मनी’ फुटबॉल क्लब ऑफ इंडिया आणि मुंबई ... Read More »

एमए परीक्षा २३ जानेवारीपासून

मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या एमए आणि एमकॉम अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नसतानाही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याचा घोळ परीक्षा विभागाने केला होता. या प्रकरणी विद्यार्थ्यांना दिलासा देत या दोन्ही अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलांची घोषणा विद्यापीठाने केली आहे. आता एमएच्या अभ्यासक्रमांची परीक्षा २३ जानेवारीपासून सुरू होणार असून, एमकॉमचे सुधारित वेळापत्रक लवकरच वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या ... Read More »

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »