Wednesday , 25 April 2018
Breaking News
Home » बातम्या » शैक्षणिक (page 4)

शैक्षणिक

मी शिष्यवृत्तीचा अर्ज मागे घेत आहे

मुंबई – सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंची कन्या श्रुती बडोलेने स्वत:हून परदेश शिष्यवृत्ती सोडण्याची तयारी दर्शवली आहे. शिष्यवृत्ती निवडीवरुन झालेल्या वादानंतर श्रुतीनं हा निर्णय घेतला आहे. यावेळी श्रुतीनं आपल्याला गुणवत्तेनुसार प्रवेश आणि शिष्य़वृत्ती मिळाली असल्याचा दावा केला आहे. तसंच, माझ्यात गुणवत्ता आहे पण माझे बाबा मंत्री आहेत, त्यात माझा काय दोष? असा सवालही श्रुतीनं विचारला आहे. मात्र, कुणाचाही हक्क आपण डावलला ... Read More »

नशीब, डोकलाम विषय संपला, नाहीतर मुंबई विद्यापीठ तेही कारण देईल – आदित्य ठाकरे

मुंबई – निकाल रखडल्यामुळे मुंबई विद्यापाठातील विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. त्यात बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचं अजब कारण विद्यापीठाने मुंबई हायकोर्टात दिलं आहे. या सर्व गोष्टींवर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी खोचक टीका केली आहे. “नशीब, डोकलामचा विषय संपला, नाहीतर डोकलाम आणि नॉर्थ कोरियाचं कारण देखील उशीर झाला म्हणून देतील.”, असं ट्वीट करत आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठावर निशाणा साधला ... Read More »

‘नीट’ विरोधात लढा देणाऱ्या ‘अनिता’ची आत्महत्या; चेन्नईत विद्यार्थ्यांची निदर्शने

नवी दिल्ली – तामिळनाडूत ‘नीट’च्या अंमलबजावणीच्या आदेशाचा सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार करावा यासाठी याचिका दाखल करणारी १७ वर्षीय दलित विद्यार्थिनी एस. अनिता हिने शुक्रवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर अनिताचा मृत्यू हा व्यवस्थेचा बळी असल्याचे सांगत आज डाव्या विद्यार्थी संघटनांनी तिला न्याय मिळावा यासाठी चेन्नईत निदर्शने केली. दरम्यान काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Tamil Nadu: Students' Federation of ... Read More »

आता डेडलाईन नाही, निकाल लवकर लागतील, तावडेंची सावध भूमिका

मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी दिलेल्या तीनही डेडलाईन हुकल्यानंतर, आता शिक्षणमंत्री विनोद तावडे डेडलाईन देण्यासाठी घाबरले. मुख्यमंत्री आणि राज्यपालांसोबतच्या बैठकीनंतर विनोद तावडेंनी पत्रकार परिषद घेतली. आता निकालाची डेडलाईन देणार नसून, लवकर निकाल लागतील अशी सावध भूमिका तावडेंनी घेतली. शिवाय सर्व निकाल लागल्यानंतर कुणी दोषी आहे का याची चौकशी करून राज्यपाल कारवाई करतील असंही तावडे म्हणाले. त्यामुऴे तावडेंच्या अशा भूमिकेमुऴे त्यांनाही ... Read More »

बहुजन साक्षर शिक्षण भारत संघटनेचा थकीत मानधन मिळण्यासाठी मोर्चा

नायगांव तालुक्यातील सर्व बहुजन साक्षर शिक्षण प्रेरक/प्रेरिका पुणे मोर्चास नांदेडचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (छाया. : प्रकाश महिपाले) Read More »

स्वातंत्र्यदिनी ८ हजार मदरशांमध्ये ‘देशभक्तीची चाचणी’

लखनऊ – स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील एक किंवा दोन नाही तब्बल ८ हजार मदरशांमध्ये देशभक्तीची चाचणी होणार आहे. एवढंच नाही तर राष्ट्रध्वज फडकवणं आणि राष्ट्रगीत म्हणणं हेदेखील अनिवार्य करण्यात आलं आहे. या सगळ्या कार्यक्रमाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचीही सक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातल्या मदरसा परिषदेनं या संदर्भातलं एक पत्रकच लागू केलं आहे. उत्तर प्रदेशात स्वातंत्र्यदिनी मदरशांना असे ... Read More »

मुंबई महापालिका शाळांमधील ‘वंदे मातरम्’ सक्तीला मनसेचा विरोध

मुंबई – मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ सक्तीच्या प्रस्तावाला काँग्रेस आणि सपानंतर मनसेनं देखील विरोध केला आहे. मुंबई महापालिकांच्या शाळांची दुरवस्था, रोडावणारी पटसंख्या, टॅब आणि शिक्षण साहित्य घोटाळा या सगळ्यांवर लक्ष देण्याऐवजी वंदे मातरमची सक्ती का, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी उपस्थित केलाय. मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये आठवड्यातून किमान दोनदा ‘वंदे मातरम्’ म्हणण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर केला. ज्याला एमआयएम आणि ... Read More »

मुंबईतील शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ अनिवार्य; पालिकेत प्रस्ताव मंजूर

मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आता ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गावे लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेत गुरूवारी यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा ‘वंदे मातरम’ गीत गाणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक होऊ शकते. हा प्रस्ताव आता अंतिम निर्णयासाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल. काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी विधानसभेत वंदे मातरमला ... Read More »

नीट परीक्षेच्या सर्व भाषांमधील प्रश्नपत्रिका सारख्याच ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसंदर्भात (NEET) सीबीएसई बोर्डाला महत्त्वपूर्ण आदेश दिले. त्यानुसार आता २०१८ पासून नीट परीक्षेच्या इंग्रजी, हिंदी आणि अन्य भाषांतील प्रश्नपत्रिका एकसारख्याच असतील. नीट परीक्षेच्या भाषेनुसार बदलणाऱ्या काठिण्यपातळीवर आक्षेप घेत काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ‘नीट’च्या पुढील परीक्षेसाठी कोणत्या निकषांच्याआधारे प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार, ... Read More »

नीट परीक्षेच्या सर्व भाषांमधील प्रश्नपत्रिका सारख्याच ठेवा! – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसंदर्भात (NEET) सीबीएसई बोर्डाला महत्त्वपूर्ण आदेश दिले. त्यानुसार आता २०१८ पासून नीट परीक्षेच्या इंग्रजी, हिंदी आणि अन्य भाषांतील प्रश्नपत्रिका एकसारख्याच असतील. नीट परीक्षेच्या भाषेनुसार बदलणाऱ्या काठिण्यपातळीवर आक्षेप घेत काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ‘नीट’च्या पुढील परीक्षेसाठी कोणत्या निकषांच्याआधारे प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार, असा सवालही ... Read More »