Breaking News
Home » बातम्या » शैक्षणिक (page 5)

शैक्षणिक

जेफरी हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल यंग यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल

स्टॉकहोम, स्वीडन – वैद्यकशास्त्रातील यंदाचा प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार २०१७, जेफरी सी. हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल डब्लू. यंग या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे. ‘molecular mechanisms controlling the circadian rhythm’ या महत्वपूर्ण संशोधनासाठी या तिघांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. जेफरी हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल यंग यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल Our biological clock helps to regulate sleep patterns, feeding ... Read More »

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुखांवर राजीनाम्यासाठी दबाव

मुंबई – मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यात ऐतिहासिक दिरंगाई करणारे कुलगुरू संजय देशमुखांवर आता राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत चालला आहे. संजय देशमुखांना लवकरच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा प्रश्न वाऱ्यावर सोडून संजय देशमुख अचानक रजेवर गेले. रविवारी देशमुखांनी राज्यपाल कार्यालयाशी संपर्क साधून पुन्हा सेवेत रुजू होण्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र देशमुख ... Read More »

‘प्रत्येक मुलीचं ऐकलं तर विद्यापीठ चालवणं कठीण’

नवी दिल्ली – बनारस हिंदू विद्यापीठात गुरुवारी (२१ सप्टेंबर) एका मुलीच्या छेडछाडीच्या घटनेनंतर करण्यात आलेल्या आंदोलनामागे ‘बाहेरच्या व्यक्ती’ असल्याचा दावा कुलगुरू जी. सी. त्रिपाठी यांनी केला आहे. विद्यापीठाचा परिसर विद्यार्थिनींसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सध्याचा वाद हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बाहेरील काही व्यक्तींनी स्वार्थासाठी उकरून काढला, असाही दावा त्यांनी केला आहे. तसेच प्रत्येक मुलीचे ऐकले तर ... Read More »

साताऱ्यात विनोद तावडे यांच्यावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न

सातारा – सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चिघळला असतानाच या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मल्हार क्रांतीच्या एका कार्यकर्त्याने साताऱ्यातील कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही वेळ कार्यक्रमात गोंधळ उडाला. या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला आज तावडे उपस्थित होते. तावडे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. ... Read More »

केंद्र सरकारच्या दबावामुळे अलाहाबाद विद्यापीठातील ‘लिबर्टी फेस्ट’ला परवानगी नाकारली

नवी दिल्ली – अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘लिबर्टी फेस्ट’ला विद्यापीठ प्रशासनाकडून ऐनवेळी परवानगी नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या दबावामुळेच विद्यापीठाने असे केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. सध्या देशभरात घडत असलेल्या हिंसाचार आणि द्वेषमुलक घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय घटनेतील संकल्पनांची महती लोकांपर्यंत नव्याने पोहोचावी, यासाठी ‘जश्न-ए-संविधान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय घटनेतील मुलभूत घटकांवर चर्चा ... Read More »

देशातील स्वच्छ महाविद्यालयांमध्ये शरद पवारांचं विद्या प्रतिष्ठान

नवी दिल्ली – महाराष्ट्रातलं सर्वात स्वच्छ महाविद्यालय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीमध्ये या महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातल्या 174 शिक्षण संस्थांची स्वच्छता मानांकनं जाहीर केली. यामध्ये स्वच्छ कॉलेज, विद्यापीठ, टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि सरकारी संस्थांचा समावेश आहे. स्वच्छ कॉलेजांच्या यादीत तामिळनाडूतील ... Read More »

जेएनयू, दिल्ली विद्यापीठाला परदेशातून मिळणाऱ्या निधीवर केंद्राची टांच

नवी दिल्ली – देशातील अनेक प्रतिष्ठित संस्थांना परदेशातून मिळणारे आर्थिक सहाय्य केंद्र सरकारकडून रोखण्यात आले आहे. यामध्ये जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू), दिल्ली विद्यापीठ, आयआयटी-दिल्ली आणि इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च (आयसीएआर) यासारख्या प्रख्यात संस्थांचा समावेश आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संस्थांची ‘फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट, २०१०’ (एफसीआरए) अंतर्गत असलेली नोंदणी रद्द केली. मागील पाच वर्षांपासून वार्षिक परतावा न भरल्याने या ... Read More »

दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत ABVP ला झटका; काँग्रेसच्या NSUI चा विजय

नवी दिल्ली – जेएनयू निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात उत्सुकतेच्या ठरलेल्या दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) या संघटनेनं अनपेक्षित बाजी मारली आहे. भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं (अभाविप) वर्चस्व मोडून काढत एनएसयुआयनं अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर नाव कोरलं आहे. अभाविपला सचिव आणि सहसचिव पदावर समाधान मानावं लागलं आहे. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय ... Read More »

आता शाळेत ‘यस सर/यस मॅडम’ ऐवजी विद्यार्थी म्हणणार जय हिंद!

नवी दिल्ली – शाळेतील मुलांनी हजेरी देताना यस सर किंवा यस मॅडमऐवजी जय हिंद म्हणावे, असा नवा आदेश मध्य प्रदेश सरकारने काढला आहे. सरकारचा हा नवा आदेश वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. एक ऑक्टोबरपासून हा आदेश लागू होणार आहे. सुरुवातीच्या काळात सतना जिल्ह्यात हा आदेश लागू होईल. यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यांमधील शाळांमध्येही या आदेशाचे पालन केले जाईल. मध्य प्रदेश सरकामधील शिक्षण ... Read More »

मुंबई विद्यापीठाच्या ४७७ पैकी ४६९ परीक्षांचे निकाल जाहीर

मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या ४७७ पैकी ४६९ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. १७ लाख ३२ हजार ९४९ उत्तर पत्रिका तपासण्याचे काम बाकी होते, ज्यापैकी ३५ हजार उत्तरपत्रिका तपासणे उरले आहे. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे आणि इतर सहकारीही हजर होते. आत्तापर्यंत २२ हजार २७५ ... Read More »

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »