Friday , 15 December 2017
Breaking News
Home » मनोरंजन

मनोरंजन

वादामुळे सिनेमा थांबू नये

कोल्हापूर – आपल्या देशात करोडो लोक राहतात. हजारो समाज आहेत. त्यांची संस्कृती, इतिहास याच्याशी जोडलेल्या परंपरांमध्ये वैविध्य आहे. साहजिकच यावर बेतलेल्या सिनेमामुळे वाद होतच राहणार. वाद यापूर्वीही होते आणि भविष्यातही होतील. पण वाद होईल म्हणून सिनेमाची भाषा मूक होऊ नये. ती एक अभिव्यक्ती आहे. त्यातून समाजाने काय चांगले घ्यायचे आणि कुठे दुर्लक्ष करायचे एवढी प्रगल्भता रसिकांमध्ये येणेही महत्वाचे आहे, अशा ... Read More »

शाहीद ठरला यंदाचा ‘सेक्सीएस्ट एशियन मॅन’

लंडन – बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ अर्थात अभिनेता शाहीद कपूर आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. जगभरात असंख्य चाहते असलेल्या या अभिनेत्याने यंदाचा ‘सेक्सीएस्ट एशियन मॅन’चा किताब पटकावलाय. विशेष म्हणजे हृतिक रोशनला मागे टाकत त्याने हा बहुमान पटकावलाय. ‘सेक्सीएस्ट एशियन मॅन’ म्हणून शाहीदची निवड होताच त्याने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘हा किताब मिळणे ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.तुमच्या ... Read More »

‘फिर हेरा फेरी’चे दिग्दर्शक, लेखक अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन

मुंबई – ‘खिलाडी ४२०’, ‘फिर हेराफेरी’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, तर ‘विरासत’, ‘रंगीला’, ‘मन’ या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे गुरुवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. गुजरातमधील भूज येथे १९६३ मध्ये नीरज व्होरा यांचा ... Read More »

सेटवरील लैंगिक शोषण रोखण्यासाठी कायदा करा; मेनका गांधींचे बॉलिवूड निर्मात्यांना पत्र

नवी दिल्ली – चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषणाच्या प्रकारांना आळा बसावा, यासाठी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी पुढाकार घेत आघाडीच्या बॉलिवूड निर्मात्यांशी पत्र लिहून संवाद साधला आहे. देशातील सर्व निर्मात्यांनी कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक विरोधी कायदा २०१३ कायद्याचे पालन करावे, असे मेनका गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच मेनका गांधी यांनी पत्रामध्ये लैंगिक शोषणाची व्याख्याही स्पष्ट केली आहे. ... Read More »

चॉकलेट हिरो काळाच्या पडद्याआड, शशी कपूर यांचं निधन

मुंबई – बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 79 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे शशी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून शशी कपूर यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. शशी कपूर यांचा जन्म 1938 मध्ये झाला होता. शशी कपूर ... Read More »

कायदा हातात घेणे चुकीचेच, मात्र लोकभावनेचा आदरही महत्त्वाचा- व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून ‘पद्मावती’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर शनिवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केले. कलाकारांना हिंसक धमक्या देणे किंवा त्यांना मारण्यासाठी इनाम जाहीर करणे, या गोष्टींना लोकशाहीत थारा नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्याचवेळी लोकांच्या भावनांचाही आदर राखला जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते शनिवारी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या साहित्य महोत्सवात बोलत होते. ... Read More »

शूर्पणखेप्रमाणे तुमचे नाक कापू; भाजप नेत्याची ममता बॅनर्जींना धमकी

नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे मुंडके कापणाऱ्याला दहा कोटींचे बक्षिस देण्याची घोषणा करणारे भाजप नेते सूरजपाल अमू यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘पद्मावती’ सिनेमाला पाठिंबा दर्शवणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे शूर्पणखेप्रमाणे नाक कापण्याची धमकी या अमू यांनी दिली आहे. Rakshasi pravriti ki jo mahilaayein hoti hain, jaise Shurpnakha ... Read More »

‘पद्मावती’ चित्रपटाला ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदील

मुंबई – जय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपट भारतातील सेन्सॉर बोर्डाने तांत्रिक बदलांचे कारण देत निर्मात्यांकडे परत पाठवला. मात्र, ‘द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने (बीबीएफसी) दीपिका पदुकोणच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाला अजिबात कात्री न लावता प्रदर्शनासाठी हिरवा कंदील दाखवला. ब्रिटनमध्ये हा चित्रपट ठरलेल्या दिवशी म्हणजेच १ डिसेंबरला प्रदर्शित होईल. त्यामुळे वादविवांदाच्या कचाट्यात सापडलेल्या ‘पद्मावती’च्या टिमला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ... Read More »

युवापिढीत ‘पद्मावती’सारख्या चित्रपटांचा नायनाट करण्याची ताकद- सूरज पाल अमू

हरयाणा – ‘पद्मावती’ चित्रपटाला होणाऱ्या विरोधाला दर दिवशी नवे वळण मिळत असल्याचे पाहायला मिळते. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा शिरच्छेद करण्याच्या आणि त्यांना जिवंत जाळण्याच्या धमक्याही देण्यात येत आहेत. करणी सेनेमागोमाग आता बऱ्याच नेतेमंडळींनीही या चित्रपटाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. हरयाणातील भाजप नेते सुरज पाल अमू यांनी तर राणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण ... Read More »

मुस्लिम मोठ्या मनाचे; ‘मुगल-ए-आझम’ला विरोध केला नव्हता- आझम खान

उत्तर प्रदेश – ‘पद्मावती’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात आता समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी उडी घेतली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड असणाऱ्या ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या गोष्टी ऐतिहासिक संदर्भाशी मिळत्याजुळत्या नव्हत्या. मात्र, मुस्लिम समाज मोठ्या मनाचा असल्यामुळे त्यांनी चित्रपटाला विरोध केला नाही, असे आझम खान यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ... Read More »