Wednesday , 23 May 2018
Breaking News
Home » महाराष्ट्र

महाराष्ट्र

दिपिका पदुकोनचे कान आणि नाक कापणाऱ्याला १ कोटीचे बक्षीस

नवी दिल्ली – ‘पद्मावत’ चित्रपटावरुन निर्माण झालेला वाद वाढतच चालला आहे. देशभरात करणी सेना आणि क्षत्रिय महासभेचे कार्यकर्ते चित्रपटाविरोधात हिंसक आंदोलने करीत आहेत. पद्मावतला विरोध करणारे लोक ठिकठिकाणी तोडफोड आणि आक्षेपार्ह वक्तव्ये करीत आहेत. या दरम्यान, कानपूर क्षत्रिय महासभेचा अध्यक्ष गजेंद्र सिंह याने अभिनेत्री दिपिका पदुकोनवर वादग्रस्त विधान केले आहे. पद्मावत चित्रपटात राणी पद्मावतीची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या दिपिका पदुकोनचे नाक आणि ... Read More »

म्हादई नदी पाणीवाटप वाद: कर्नाटकात बंद, मोदींनी हस्तक्षेप करण्याची मागणी

बेंगळुरु – गोवा आणि कर्नाटकमधील म्हादई नदीचा वाद आता पेटला असून गुरुवारी कर्नाटकमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. राज्यातील बहुसंख्य शाळा, बाजारपेठा बंद असून राज्यातील डॉक्टरांनी काळी फित लावून बंदला पाठिंबा दिला. तर भाजपने बंदमागे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. कर्नाटक व गोवा यांच्यात म्हादई नदीच्या पाणीवाटपावरून वाद असून या नदीला गोव्यात मांडवी म्हणतात. पाणी वाटप लवादापुढे हा प्रश्न सुनावणीसाठी आहे. ... Read More »

माओवाद्यांच्या हल्ल्यात चार जवान शहीद

रायपूर – छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात बुधवारी माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद तर नऊ जवान जखमी झाले. मृतांमध्ये दोन उपनिरीक्षक आणि दोन जवानांचा समावेश आहे. या चकमकीत माओवादी किती ठार झालेत याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलाचे ६० जवान अबुझमाड भागात शोधमोहीम राबवत होते. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. चकमकीदरम्यान ... Read More »

डीएसकेंना अटकेपासून ५ फेब्रुवारीपर्यंत दिलासा

मुंबई – ठेवीदारांची देणी परत करण्यासाठीची २५ टक्के रक्कम म्हणजेच ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यात अपयशी ठरलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णींना गुरुवारी मुंबई हायकोर्टाने खडे बोल सुनावले. तसेच या प्रकरणात डीएसकेंना हायकोर्टाने ५ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी सध्या अडचणीत आले आहेत. या प्रकरणी गुरुवारी हायकोर्टाने सुनावणी झाली. ... Read More »

भीमा-कोरेगाव येथील युध्दात शहीद झालेल्या सिध्दनाक-3 यांच्या वंशातील पाचव्या पिढीच्या प्रतिनिधी आयु. मनिषा संजय सामंत यांना मासिक सिंहलोकचा अंक भेट देताना संपादक चंद्रकांत सोनवणे सोबत संजय सामंत व डॉ आशिष तांबे. Read More »

१ जानेवारी १८१८च्या भीमा-कोरेगाव युध्दात पेशव्यांचा पाडाव करणाऱ्या युध्दात शहीद झालेल्या सिध्दनाक – ३ यांच्या वंशात सहाव्या पिढीच्या प्रतिनिधी असलेल्या आयु. मनिषा संजय सामंत यांनी 3Ways Media च्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. Read More »

अटकपूर्व जामीनासाठी डीएसके पुन्हा हायकोर्टात

मुंबई – पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी अटकपूर्व जामीनासाठी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयासमोर आले. हायकोर्टाच्या आदेशांप्रमाणे डीएसकेंनी 50 कोटी रुपये 19 जानेवारीपर्यंत जमा करण्याची कबुली सर्वोच्च न्यायालयात दिली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 19 जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे. पण ही मुदत संपायला काही तास उरलेले असताना अजूनही डीएसके यांनी 50 कोटी रुपये भरले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ... Read More »

हाफिज सईदविरोधात पुष्कळ पुरावे – हमीद करझाई

नवी दिल्ली – मुंबई हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईद याच्याविरोधात पुष्कळ पुरावे आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे, असे सांगत अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांना उघडे पाडले आहे. सईदला साहेब असे संबोधत त्याच्याविरोधात कुठलाही खटला सुरु नाही, असे अब्बासी यांनी म्हटले होते. २०१८च्या रायसिना डायलॉगमध्ये सहभागी होण्यासाठी करझाई नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी ते ... Read More »

सुप्रीम कोर्टाने दुखावल्या कोट्यवधी हिंदूंच्या भावना- सूरज पाल अमू

नवी दिल्ली – ‘पद्मावत’ चित्रपटावरील चार राज्यांमधील बंदी उठवण्याचे आदेश देऊन सुप्रीम कोर्टाने कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्याची टीका हरयाणातील माजी भाजप नेते सूरज पाल अमू यांनी केली आहे. त्याचबरोबर मला फाशी दिली चालेल, पण संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटाला आमचा विरोध कायम असेल, असे विधान त्यांनी केले. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरयाणा या चार राज्यांमध्ये असलेल्या चित्रपटांच्या बंदीवर सुप्रीम ... Read More »

सोनई तिहेरी हत्याकांडातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी; फैसला २० जानेवारीला

नाशिक – अहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांडाप्रकरणी नाशिकमधील जिल्हा सत्रन्यायालयातील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली. दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. शिक्षेबाबत न्यायालय २० जानेवारी रोजी निर्णय देणार आहे. पाच वर्षांपूर्वी राज्याला हादरवून सोडणाऱ्या सोनईतील तिहेरी हत्याकांडाप्रकरणी सोमवारी नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयाने सहा जणांना दोषी ठरवले होते. तर एकाची पुराव्याअभावी मुक्तता केली होती. दोषींच्या शिक्षेबाबत गुरुवारी न्यायालयात सुनावणी ... Read More »