Friday , 16 November 2018
Breaking News
Home » लोक सहभाग

लोक सहभाग

दिल्ली विद्यापीठात काय शिकवतात कांचा इलय्याची पुस्तकं . . . .

दिल्ली विद्यापीठात काय शिकवतात कांचा इलय्याची पुस्तकं . . . . सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आपल्या निवृत्ती नंतर एका मुलाखतीत म्हणाले होते , “कुणी माझ्यावर किती टीका करावी ही बाब आक्षेपार्ह होऊ शकत नाही आणि आपण त्याच्या बोलण्यावर बंदीही आणू शकत नाही. कारण त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्याची मी शपथ घेतलेली आहे. तर प्रसिद्ध पाश्चात्य विचारवंत हॉल्टेअर म्हणतात “ ... Read More »

प्रवेश मंदिराच्या चौथ-यावर नाही….समाजमनाच्या उंबरठ्यावर हवा

स्त्री स्वातंत्र्य ही एक व्यापक संकल्पना आहे. तिला अनेक पैलू आहेत. या स्वातंत्र्याची संकल्पना संक्षिप्त स्वरूपात मांडणे शक्य नसले तरी मानवी जीवन मुल्यांच्या अनुषंगाने या संकल्पनेला शब्दस्वरूप देताना स्त्री स्वातंत्र्य म्हणजे माणूस म्हणून स्वातंत्र्य, समता आणि मूलभूत अधिकार स्त्रीला सहज स्वाभाविकपणे समाजात उपलब्ध असणे म्हणजे स्त्री स्वातंत्र्य म्हणता येईल. भारतीय सामाजिक इतिहास पाहता आपल्या स्त्रीला सातत्याने समाज व्यवस्थेच्या चौकटीत ठेवण्याचा ... Read More »

मुर्दा घरातला मामा – वैभव छाया

मूर्दाघरातला मामा… मूर्दाघरातला मामा तंबारल्या डोळ्यांनी फिरत असतो मुर्द्यान्मधून एकटाच भुतासारखा रात्री बेरात्री पीकलेल्या केसांना छातीवर मिरवत मावा खाऊन पचापच थुकतो तेव्हा माझा मेंदू ईथर नी केशरच्या वासाचं पृथःकरण करत त्याला घाम पुसताना पाहत असतो आरपार मूर्दाघरातला मामा नसतो तुमच्या माझ्यासारखा मृत्यूला पाहून घाबरणारा फाशीवाला जल्लाद मला वाटतो त्याच्याच भावासारखा दोन्ही चालून बोलून सैतानच या मामात नी माझ्यात बरीच साम्यंयेत ... Read More »

अलाहाबाद आधी इलावास होते;प्रयाग तर नव्हेच नव्हे! – आर. एस. खणके

अलाहाबादचे नाव प्रयाग कधीच नव्हते उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या अलाहाबाद या शहराचे नाव बदलण्याचा प्रदेश सरकारने निर्णय केला असल्याने यापुढे या प्रदेशाची राजधानी प्रयागराज या नावाने ओळखली जाणार आहे. अलाहाबाद हे नाव मुघल सम्राट अकबराच्या कार्यकाळात पडलेले. असे असले तरी या शहराचे मूळ नाव इलावास या शहरावरून पडलेले आहे याची ओळख फार कमी लोकांना माहित आहे. प्राचीनकाळी गंगेच्या काठावर याठिकाणी प्रतिष्ठानपूरी ... Read More »

कुसुमाग्रजांच्या कवितेतील उपमा विद्वत्ता ; मनवरांच्या काव्यात अश्लीलता शोधणाऱ्यांचा सवतासुभा – आर. एस. खणके

खोल की उथळ. . . . कसं आहे दिनकर मनवरांच्या कवितेतलं पाणी . . . . दिनकर मनवर यांच्या ‘पाणी कसं असतं’ या कविते वरुन सध्याला राज्यभर समाजमाध्यमा मध्ये चर्चा घडत आहे. ज्याला आपण मुख्य प्रवाहातले माध्यमं म्हणतो त्यातून मात्र यावर व्यापक चर्चा होताना दिसत नाही. समाजातल्या बुद्धीजीवी स्तरावरून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका वदली जात आहे.समाजातून उभा राहत असलेला ... Read More »

जाती आधारीत हत्यातील एका मुलीची यातना!

  डँडी … मी लहान असताना मला आवडलेली प्रत्येक गोष्ट देण्याकडे तुमचा कल असायचा मी आनंदी राहावी म्हणुण खुप काही करायचे तुम्ही तुमच्या डोळ्यासमोरुन माझे बालपण निघुन गेले तुमचे प्रेम तुमचा धाक तुम्हाला वाटणारी काळजीही होतीच म्हणा! बालपण गेले अन तरुणपण आले माझ्या स्वप्नाना नवे कोंब फुटले आता मला आयुष्यभरासाठी एक जोडीदार हवा होता माझ्या सोबत हसणारा ..रडणारा अन तो ... Read More »

आजकालचे पुरोगामीत्व हे वरवरचे उथळ, बेगडी

काही दिवसांपूर्वीच तेलंगणामध्ये एका कुख्यात गँगला फक्त एक कोटीची सुपारी देऊन प्रणयची डोक्यात आणि मानेत खाटकाच्या सराईत शैलीने घाव टाकून दिवसाढवळ्या खुलेआम हत्या करण्यात आली. प्रणय आणि अमृताचे फेसबुकवरील एकमेकांच्या प्रेमाची नितांतनिर्मळसुंदर साक्ष देणारे व्हिडिओ व्हायरल होणे थांबत नाही तोवरच पाठोपाठ महाराष्ट्रात मालेगावात नेहाची झोपेच्या वीसेक गोळ्या जेवणात कालवून नंतर शांतपणे गळा दाबून कुणालाही सुपारी न देता थेट आईबापानीच पुढाकार ... Read More »

आदिवासी मुलीचे विभस्त वर्णन करणारे, कवी दिनकर मनवरवर कार्यवाही झाली पाहीजे….

  “पाणी कसं असतं'” या कवितेतून दिनकर मनवर यांनी आदिवासी मुलीबाबतची मांडलेली भुमीका, आदिवासींच्या सांस्क्रुतीक मुल्यांची पायमल्ली करुन अवास्तवादी अस्लीलतेचे प्रदर्शन करणारे आहे. अदिवासी मुलीच्या स्तनातून निघणारे पाणि हे निळे असते, ही भ्रांमक कल्पना कवितेतुन मांडून, अादिवासी मुलीचे अवास्तववादी वर्णन करणारे आहे. असे वर्णन आदिवासीच काय पण कोणत्याही जाती धर्माच्या मुलीबध्दल केले असते तरी देखील निषेर्धार्यच आहे. मुबंई विद्यापीठांच्या मराठी ... Read More »

मत विभाजनाचे आव्हान पेलणार कसे!

सध्याच्या स्थितीला महाराष्ट्राच्या राजकारणात जी घालमेल सुरू आहे , ती कधी नवे ते आज SC च्या व्होटिंग ला ज्यास्त महत्व दिल्या जात आहे , आणि ते पण तेवढच सत्य आहे की SC व्होटरवर्ती महाराष्ट्राच्या राजकारनाच गणित अवलंबून आहे .… परंतु SC व्होटरवर्ती दावा करणारे सध्या तरी महाराष्ट्रात प्रभळ दोन पक्ष दिसत आहेत, एक बसपा आणि दुसरा भारिप आणि परंपरागत काँग्रेस ... Read More »

*सैराट सैतानी

*सैराट या चित्रपटात दाखविलेल्या आर्चि आणि परश्याची हत्या आता देशभरात ‘सैराट’ होतेय.त्यवर ही रचना* *टिकावली* *सैराट सैतानी* चित्रपटाच्या लोकप्रियतेची ही दुसरी काळोखी बाजू प्रेमपाखरांच्या विरोधात सैतानी प्रवृत्ती लागल्या माजू ‘नागराज’ नाही ही मंजूळ वाणी गढळू लागले जातीयवादी पाणी तुझ्या ‘सैराट’ किर्तिसोबत माथी निरापराधांचे रक्त तुझ्या पाणि (पाणि-हात) ~*विष्णू जोंधळे,शहादा,नंदुरबार ९५५२१०७१२५/९४२३१९४६३३ Read More »

IMG-20160507-WA0000.jpg